23.1 C
New York

Bigg Boss Marathi 5: पहिल्याच दिवशी ‘त्या’ दोघींमध्ये वादाची ठिणगी!

Published:

Bigg Boss Marathi 5: गेल्या अनेक दिवसांपासून ज्या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाला (Bigg Boss Marathi 5) दणक्यात सुरुवात झाली आहे. यंदा ‘बिग बॉस मराठी’मध्ये शोचा होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत अनेक ट्विस्ट आत्तापर्यंत पाहायला मिळाले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांनी एन्ट्री घेताच त्या दोघींमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या घरामधील एक व्हिडिओ समोर आला आहे.

Bigg Boss Marathi 5: ९०चं दशक गाजवलेल्या अभिनेत्री वर्षा उसगावकर (Varsha Usgoankar) यंदाच्या पर्वात सहभागी झाल्या आहेत. वर्षा उसगावकर यांना ‘बिग बॉस मराठी’च्या घरात पाहताच चाहतेही खूप आनंदी झाले. मात्र पहिल्याच दिवशी त्यांच्यावर घरातील सदस्य चिडल्याचं पाहायला मिळतंय. पहिल्याच दिवशी घरात पाणी नसल्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांच्या तोडंचं पाणी पळालं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत वर्षा उसगावकर (Varsha Usgoankar) आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli) या दोघींमध्ये वादाची ठिणगी उडाल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये वर्षा उसगावकर बेडरुममध्ये मेकअप करत असल्याचं दिसतंय. तर हॉलमध्ये बसलेले सगळे सदस्य त्यांची वाट पाहत आहेत.

‘बिग बॉस’च्या घरात एकूण १६ स्पर्धकांची एन्ट्री!

निक्की तांबोळी त्यांना बोलवायला जाते आणि म्हणते की, आता मेकअप नंतर करा ना प्लीज. त्यावर वर्षा उसगावकर तिला म्हणाल्या की, “मला थोडंसं तयार व्हायलाच पाहिजे. तू व्यवस्थित तयार झालीस”. त्यानंतर निक्की म्हणते की पाणी कधीच आलं होतं. तुम्ही जायला पाहिजे होतं. आता लिपस्टिक तरी नंतर लावा, चला आधी. निक्कीच्या या बोलण्यावर वर्षा तिला म्हणतात, “लिपस्टिक नंतर लावा कसं? तू छानपैकी तयार होऊन गेली आहेस”. त्यानंतर घरातील इतर सदस्यही त्यांना हॉलमधून बोलवत असतात. पण, वर्षा उसगावकर मात्र मेकअप पूर्ण केल्याशिवाय बेडरुममधून बाहेर पडत नाहीत.

‘बिग बॉस मराठी ५’चे स्पर्धक
अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगावकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, निखिल दामले, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरिना रुडाकोवा, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरषोत्तम दादा पाटील, धनंजय पोवार, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img