Bigg Boss Marathi 5: अखेर प्रेक्षकांची उत्सुकता समाप्त झालेली आहे. ‘बिग बॉस मराठी’चा पाचव्या (Bigg Boss Marathi 5) पर्वाची मोठ्या दणक्यात सुरुवात झालेली आहे. यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) सांभाळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यावर्षी घरात स्पर्धक म्हणून कोण प्रवेश करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता लागून राहिली होती. अखेर काल पार पडणाऱ्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात याचा उलगडा झालाच. ‘बिग बॉस’चं संपूर्ण घर यावर्षी स्पर्धकांसाठी काचेच्या महालासारखं सजवण्यात आलेलं आहे.
दणक्यात १६ स्पर्धकांचा बिग बॉसच्या घरात प्रवेश
Bigg Boss Marathi 5: कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, पुरुषोत्तमदादा पाटील, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण या १६ स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात ग्रँड एन्ट्री घेतली आहे.
आर्चीच्या घरी आली तिच्या हक्काची पाहुणी!
चक्रव्यूहात स्पर्धक अडकणार?
यंदा चक्रव्यूह अशी थीम बिग बॉसच्या घरात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता स्पर्धक चक्रव्यूहात अडकणार आहेत की त्यांना ते भेदता येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे बिग बॉसच्या चक्रव्यूहाची सुरुवात स्पर्धक घरात जातानाच करण्यात आली. एक डिलेमा म्हणून बिग बॉसच्या घरात ठेवण्यात आला होता. यामध्ये स्पर्धकांना लागणारी एक गरजेची गोष्ट आणि दुसरीकडे बिग बॉसची करन्सी ठेवण्यात आली होती. यातील अनेक स्पर्धकांनी त्यांना हवी असलेली गोष्ट घेतली तर काहींनी करन्सी घेतली. त्यामुळे आता या पर्वाची कोणती रंगत येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रत्येक आठवड्यात मनोरंजनाचा धमाका आणि झटका
प्रत्येक आठवड्यात रंगणार मनोरंजनाचा धमाका आणि लागेल झटका. अशक्य गोष्टींनी बनलेला ‘बिग बॉस मराठी’चा नवा पर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज झाला आहे. घरामधील मजा, मस्ती, डाव, प्रतिडाव आणि नव्या होस्टची कमाल अशा सगळ्याच गोष्टी पाहण्याची, अनुभवण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.