3.8 C
New York

Ravichandran Ashwin : दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात अश्विन स्वतःच पडले, नेमकं प्रकरण काय

Published:

निर्भयसिंह राणे

रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) तामिळनाडू प्रीमियर लीगमधल्या दिंडीगुल ड्रॅगन्स (Dindigul Dragons) आणि नेल्लाई रॉयल किंग्स (Nellai Royal Kings) यांच्यातील सामन्यात एक अनोखा क्षण अनुभवला. फिरकीपटू एस. मोहन प्रसादने अश्विनला नॉन-स्ट्रायकर एन्डला क्रीज सोडायच्या आधी इशारा दिला. ही घटना ड्रॅगन्सच्या पहिल्या षटकात घडली ज्यानी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

अश्विनला सावध करण्यासाठी प्रसादने त्याची बॉलिग्न ॲक्शन मध्येच थांबवली. अश्विन नेहमीच नॉन-स्ट्रायकर फलंदाजांना क्रीज न सोडण्याची चेतावणी देण्यासाठी व त्यांना बाद करण्यासाठी ओळखले जात असल्याने ही परिस्थिती फारच मनोरंजक होती. या घटनेचा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

IND vs SL : T20 तील विजयरथाची घोडदौड सुरू, श्रीलंकेच्याविरुद्ध मालिकेत विजय

दोन्ही संघांची प्लेइंग 11 :

डिंडीगुल ड्रॅगन्स (प्लेइंग इलेव्हन):
विमल खुमर, शिवम सिंग, बाबा इंद्रजीथ (विकेटकीपर), सी सरथ कुमार, रविचंद्रन अश्विन (कर्णधार), बूपती कुमार, एस दिनेश राज, सुबोथ भाटी, वरुण चक्रवर्ती, पी विघ्नेश, व्हीपी दिरान

नेल्लई रॉयल किंग्स (प्लेइंग इलेव्हन):
लक्ष्मेशा सूर्यप्रकाश, अजितेश गुरुस्वामी (कर्णधार), निधिश राजगोपाल, एसजे अरुण कुमार, रितिक इसवरन (विकेटकीपर), सोनू यादव, एनएस हरीश, एन काबिलन, एस मोहन प्रसाथ, आर सिलांबरसन, जे रोहन

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img