3.1 C
New York

MPSC Exam : एमपीएससी मध्ये ‘हे’ दिवांग प्रमाणपत्र घोटाळा? ‘ते’ 9 अधिकारी रडारवर

Published:

मुंबई

जगातील दुसरी सर्वात अवघड आणि देशातील सर्वात अवघड परीक्षा असा नावलौकीक असणाऱ्या, सर्वाधिक पारदर्शकतेची ओळख असलेल्या यूपीएससी (UPSC) परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरून वादंग सुरू आहे. असं असताना राज्यातील सर्वात महत्त्वाची (MPSC Exam) परीक्षा समजली जाणारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र संदर्भात वाद समोर आला आहे.

2022 मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील दिव्यांग कोट्यातून निवड झालेल्या 10 पैकी नऊ उमेदवारांची प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आहे. या सर्व उमेदवारांची शारीरिक तपासणी करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने एमपीएससीला दिले आहेत. या सर्व उमेदवारांच्या आजपासून पुढचे दोन दिवस नव्याने शारीरिक चाचण्या होण्याची शक्यता आहे. एकूण 623 पदांसाठी परीक्षा झाली होती. यातील 10 जागा दिव्यांगांसाठी राखीव होत्या. यूपीएससी नंतर आता एमपीएससीच्या पदांमधील दिव्यांग कोट्यात खोटी प्रमाणपत्रे सादर करण्यात आल्याची शंका आहे. यामध्ये तहसीलदार, गटविकास ते उपजिल्हाधिकाऱ्यांचा पदावर निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश आहे.

दिव्यांग कोट्यातून उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेल्या बुलढाणा येथील एका उमेदवाराचं दिव्यांग प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आहे. दिव्यांग कोट्यातून निवड झालेल्या या उमेदवाराने याआधी खेळाडू, अंध आणि इतर कोट्यांचा फायदा घेतला होता. त्यांच्या निवडीवर आक्षेप घेत, त्यांची तक्रार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ यांच्याकडे करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img