हवामान खात्याने भंडारा जिल्ह्यासाठी शनिवारी (दि. 27) ऑरेंज अलर्ट (Rain Update) जाहीर केला होता. त्यामुळे दिवसभर मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रिपरिप पावसामुळे अनेकांना शहरात हिल स्टेशनवर असल्यासारखे वाटले. हवामान खात्याने पुढील चार दिवसांचा येलो अलर्ट जारी केला आहे. यात विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यताही व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दोन दिवस विश्रांती घेतली होती. त्यानंतर पुन्हा पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र चिखलमय स्थिती निर्माण झाली होती. आसगाव व विरली येथे अतिवृष्टी झाली. आसगावात आतापर्यंत 1018.0 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. जो अपेक्षित पावसाच्या 282 टक्के झाल्याची नोंद आहे. विरली येथे 1003.4 मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय बारवा, लाखांदूर येथे 999.8, सावरला येथे 947.6 मिमी पाऊस, 850.0 मिमी आणि भागडी येथे 818.9 मिमी पाऊस झाला आहे.
‘मविआ’चे सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा – नाना पटोले
Rain Update गोसेखुर्द धरणातून विसर्ग सुरूच
जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या गोसेखुर्दचे 11 दरवाजे 0.50 मीटरने उघडले आहेत. येथून 1327.17 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. धापेवाडा धरणातून 1132.63 क्युसेक पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत असून, पुजारीटोला धरणाचे 4 दरवाजेही उघडले आहेत.