महिला आशिया कपच्या फायनलमध्ये (Women Asia Cup) श्रीलंकेने भारतीय संघाला 8 विकेटने पराभूत करत इतिहास रचला आहे. श्रीलंकेच्या संघाने पहिल्यांदाच आशिया कप जिंकला आहे. भारतीने (India) संघाने लंकेसमोर ( Srilanka) 166 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य लंकेच्या संघाने हे लक्ष्य 19 ओव्हरमध्ये दोन विकेट्सच्या मोबदल्यात गाठले. श्रीलंका आशिया चषक जिंकणारा भारत आणि बांगलादेशनंतरचा तिसरा महिला संघ बनला आहे.
भारताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्सच्या बदल्यात 165 धावा केल्या होत्या. स्मृती मानधनाने सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. तर ऋचा घोषणे 30 धावांची खेळी केली. प्रत्त्युरात श्रीलंकेचे सुरुवात खराब झाली.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
श्रीलंका महिला (प्लेइंग इलेव्हन): विश्मी गुणरत्ने, चामरी अथापथु (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), हसिनी परेरा, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी, सचीला प्रबोधन.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, उमा चेत्री, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, तनुजा कंवर, रेणुका ठाकूर सिंग.