4.1 C
New York

Prakash Ambedkar : जरांगे – फडणवीस भांडण म्हणजे नौटंकी! आंबेडकरांचा दावा

Published:

उस्मानाबाद

गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. फडणवीसांकडूनही त्यावर स्पष्ट भूमिका मांडली जात आहे. मात्र, आता मराठा आरक्षणावरून या दोघांमध्ये सुरू असलेल्या वादावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठे वक्तव्य केलं. या भांडणामागे ओबीसींना फसवण्याचा डाव असल्याचा दावा आंबेडकरांनी केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांचे भांडण नाही, तर नौटंकी आहे. जरांगे यांनी शिव्या दिल्या की, फडणवीस ओबीसींना येऊन सांगतात की बघा हा मला शिव्या देतो. कंबरेखालची भाषा वापरतो. मग त्यांना जेलमध्ये टाका गृहमंत्री आहात. पण ते टाकणार नाहीत. कारण, जरांगे यांना जेलमध्ये टाकलं तर त्यांना ओबीसींकडे जाता येणार नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, निवडणूक होईपर्यंत राजकीय पक्ष यावर तोडगा काढणार नाहीत. आरक्षणाच्या प्रश्नाला हे असेच झुलवत ठेवतील. पण आपल्याला मात्र सावध व्हायचे आहे. राजकीय मतभेद जेव्हा सामाजिक मतभेद होतात, तेव्हा द्वेषाचे वातावरण तयार होते. राजकीय पुढारी आपल्याला झुलवत ठेवत आहेत. त्यासाठी ओबीसींनाच आपला लढा उभा करावा लागणार आहे. मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांना खालच्या भाषेत बोलतात. तरीही देवेंद्र फडणवीस आणि भाजप त्यांना काही बोलत नाही. ओबीसींना वाटत आहे की, फडणवीस आपला नेता आहे. हे फसवं राजकारण आहे हे लक्षात घ्या.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी ओबीसींना सांगू इच्छितो की, 100 आमदार निवडून आणल्याशिवाय आपण आरक्षण वाचवू शकत नाही हे लक्षात घ्या. आरक्षण वाचवण्यासाठी राजकीय ओळख निर्माण केली पाहिजे. आणि ते करण्यासाठी ओबीसी म्हणून एकत्र आले पाहिजे. असे आवाहनही त्यांनी यावे या ळी केले. राष्ट्रवादीचे शरद पवार प्रमुख शरद पवार यांच्यावरही ॲड. आंबेडकर यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्यात जे वातावरण पेटले आहे, ते शांत करण्यासाठी शरद पवारांना पाणी टाकायचं नाही, तर डिझेल आणि पेट्रोल टाकून त्याचा भडका करायचा आहे. अशा नेत्यांपासून सावध रहा.

प्रस्थापित पक्षांनी आपले आरक्षण संपवले – रेखाताई ठाकूर

ओबीसींना आमदार, खासदार होण्यासाठी आरक्षण नाही. आपल्याला ग्रामपंचायत, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये आरक्षण नाही. आपले आरक्षण संपवण्याचे काम इथल्या प्रस्थापित पक्षांनी केले असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img