8.7 C
New York

Suryakumar Yadav : विराट कोहलीला टाकतं, सूर्यकुमार यादव रचला इतिहास!

Published:

भारताचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. २७ जुलै रोजी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना पार पडला. या मॅचमध्ये श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच श्रीलंका दौऱ्यातील ही मालिका खेळात आहे. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने ४३ धावांनी विजय मिळवून पहिला सामना जिंकला आहे. भारताच्या संघाने फलंदाजीचे आव्हान स्वीकारून दमदार फलंदाजी करून धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दमदार कामगिरी केली.

Suryakumar Yadav कॅप्टन सूर्यकुमार यादवची कामगिरी

भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्यांमध्ये २६ चेंडूंमध्ये ५८ धावा केल्या. या शानदार खेळीसाठी सूर्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला. हा त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सामनावीराचा १६ जेतेपद होते. त्याचबरोबर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सुद्धा प्लेअर ऑफ द मॅचचे १६ ‘किताब जिंकले आहेत. त्यामुळे आता सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांची १६-१६ अशी कामगिरी झाली आहे.’

‘टीम इंडीयाने पाकिस्तानात का जावं?’ हरभजनचा सवाल

Suryakumar Yadav सूर्याने रचला इतिहास

विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या दोघांचे सारखेच सामनावीराचे खिताब आहेत. परंतु विराट कोहलीने १२५ सामन्यांमध्ये १६ ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकले आहेत, तर सूर्याने केवळ ६९ सामन्यांमध्ये १६ ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकले आहेत.

Suryakumar Yadav आंतरराष्ट्रीय T२० मध्ये सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द मॅच’ मिळवणारे खेळाडू

१६ – सूर्यकुमार यादव (६९ सामने)
१६ – विराट कोहली (१२५ सामने)
१५ – सिकंदर रझा (९१ सामने)
१४ – मोहम्मद नबी (१२९ सामने)
१४ – रोहित शर्मा (१५९ सामने)
१४ – विरनदीप सिंग (७८ सामने)

Suryakumar Yadav भारताचा पुढील सामना कधी?

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आज मालिकेचा दुसरा सामना रंगणार आहे. यामध्ये भारताचा संघासाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. कारण आजच्या सामन्यामध्ये विजय मिळवल्यास भारताचा संघ मालिका नावावर करेल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img