16.5 C
New York

Paris Olympic : मनू भाकरने ब्राँझ मेडल जिंकत रचला इतिहास

Published:

पॅरीस

पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत (Paris Olympics) भारताच्या मनू भाकरने (Manu Bhaker) महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे.

२२ वर्षीय मनू भाकरने महिला १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. तिने शनिवारी पात्रता फेरीत तिसरा क्रमांक मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. आता अंतिम फेरीत तिने २२१.७ गुण मिळवत पदकावर हक्क सांगितला.

मनू भाकर नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी भारताची पाचवी नेमबाज, तर पहिलीच महिला नेमबाज ठरली आहे. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनू भाकरने स्टेज 1 मध्ये 50.4 स्कोर केला ज्यामुळे ती स्टेज 1 नंतर दुसऱ्या स्थानावर होती. त्यानंतर १३ शॉट्सपर्यंत ती पहिल्या दोनमध्ये होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img