21 C
New York

Pankaja Munde : पंकजा मुंडे पुन्हा आमदार, विधानपरिषद सदस्यत्वाची घेतली शपथ

Published:

विधानपरिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या अकरा (MLC Taking Oath) आमदारांनी आज विधिमंडळ सभागृहात शपथ घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यावेळी विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही (Pankaja Munde) शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) पंकजा मुंडे यांचा थोडक्यात पराभव झाला होता. बीड लोकसभा मतदारसंघात (Beed Lok Sabha) महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे विजयी झाले. मराठवाड्यात भाजपला (BJP) मोठा धक्का बसला.

भारतीय जनता पार्टीने त्यांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने विधानपरिषदेचं तिकीट दिलं (MLC Elections 2024) आणि निवडूनही आणलं. आज विधीमंडळ सभागृहात पंकजांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. पंकजा मुंडेंनी शपथ घ्यायला सुरुवात करताच उपसभापती नीलम गोऱ्हेंनी त्यांना थांबवलं. मी म्हटल्यावर तुम्ही पुढे बोला असं त्यांनी सांगितलं. यानंतर पंकजा मुंडेंनी शपथ घेतली. यानंतर सदाभाऊ खोत, मिलींद नार्वेकर (Milind Narvekar) आणि अन्य आमदारांनी शपथ घेतली.

पूर परिस्थिती हाताळण्यात अपयश; पुणे मनपाचे सहाय्यक आयुक्त निलंबित

आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्यांत भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत यांचा समावेश होता. तसेच शिंदे गटाच्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने यानी शपथ घेतली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसेचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांनी शपथ घेतली. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि उद्धव ठाकरे गटाचे मिलींद नॉर्वेकर यांनीही विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.

Pankaja Munde काँग्रेसचं विमान जमिनीवर

लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्याने काँग्रेस नेते अतिआत्मविश्वासात वावरत होते. राज्यात काँग्रेसच्या जागा वाढल्या होत्या. याचा परिणाम विधानपरिषदेच्या निवडणुकीतही दिसेल असे सांगितले जात होते. मात्र तसे काहीच घडले नाही. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटली. त्यामुळे महाविकास आघाडीला शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी निवडून आणता आलं नाही.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाला व महायुतीचे सर्वच सर्व 9 उमेदवार विजयी झाले. परंतु, शरद पवार यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसची मतं फुटल्याचं स्पष्ट झालं. या फुटीर आमदारांवर कारवाईचा इशारा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिला होता. दिल्लीतील नेत्यांना अहवाल पाठवण्यात आल्याचेही सांगितले होते. मात्र अद्याप या आमदारांवर कोणतीच कारवाई झाल्याची बातमी नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img