मुंबई
विधानपरिषदेच्या निवडणुकीत (Vidhanparishad Election) निवडून आलेल्या अकरा (MLC Taking Oath) आमदारांनी आज विधिमंडळ सभागृहात शपथ घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यावेळी विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही (Pankaja Munde) शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) पंकजा मुंडे यांचा थोडक्यात पराभव झाला होता. बीड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे विजयी झाले. मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का बसला.
पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी या यंदाही यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी इच्छुक होत्या. शिवसेना फुटीनंतर त्यांनी शिंदेंना साथ दिली. यावेळी त्यांनाच तिकीट मिळेल असा अंदाज होता. मात्र महायुती असल्याकारणाने त्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि त्याजागी हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना देण्यात आलं होतं. याशिवाय आज शपथविधीदरम्यान आमदार मिलिंद नार्वेकर यांनी बाळासाहेबांना नमन करून शपथविधीला सुरुवात केली.
शपथ घेतलेले सदस्य
पंकजा गोपीनाथराव मुंडे
सदाशिव रामचंद्र खोत
डॉ. परिणय रमेश फुके
भावना पुंडलीकराव गवळी
कृपाल हिराबाई बालाजी तुमाने
योगेश कुंडलीक टिळेकर
डॉ.प्रज्ञा राजीव सातव
शिवाजीराव यशवंत गर्जे
अमित गणपत गोरखे
मिलिंद केशव नार्वेकर
राजेश उत्तमराव विटेकर