3.6 C
New York

SL vs IND : बॉलर्सची कमाल, गंभीर गुरूजींची विजयी सुरूवात

Published:

निर्भयसिंह राणे

श्रीलंकेचे (Sri Lanka) सलामीवीर पथुम निसांका (Pathum Nissanka) आणि कुसल मेंडिस (Kusal Mendis) यांनी पल्लेकेले येथे पहिल्या T20 मध्ये 214 धावांचा पाठलाग करताना त्यांच्या संघाला उत्कृष्ट सुरुवात करून देण्यासाठी दोन्ही सलामीवीरांनी चांगली कामगिरी बजावली. अर्शदीप सिंग त्याच्या दुसऱ्या स्पेलसाठी आला आणि त्यांने कुसल मेंडिसला बाद करून भारताला यश मिळवून दिले. निसांकाने 34 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करून 214 धावांचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकाची जिंकण्याची अशा जागृत केली.

पथुम निसांकाने 48 चेंडूत 79 धावांची खेळी केली तरीही, 214 चे लक्ष्य श्रीलंकेसाठी खूप कठीण होते आणि श्रीलंकेची मधल्या फळीने त्यांना दगा दिल्याने त्यांच्यासाठी स्कोर चेस करणं अवघड बनत गेलं आणि भरताने श्रीलंकेला पराभूत करून 1-0 अशी मालिकेत आघाडी घेतली.

कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) त्याच्या फुल-टाइम कर्णधारपदाची सुरुवात उत्साहपूर्ण पद्धतीने केली कारण भारताने पहिली इंनिंग्समध्ये 213/7 अशी उत्कृष्ट अशी धावसंख्या केली. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी धडाकेबाज सुरुवात केल्यानंतर, सूर्यकुमार यादवने स्फोटक अर्धशतक ठोकले आणि 58 धावा केल्या. ऋषभ पंतसह सूर्यकुमारने 76 धावांची पार्टनरशिप केली, ज्यात पंतने 49 धावा केल्या.

सलामीवीर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी पॉवरप्लेमध्ये पहिल्या विकेटसाठी 74 धावांची पार्टनरशिप केल्याने भारताची सुरुवात फारच दमदार होती. श्रीलंकेचा कर्णधार चारीथ असालंकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गिलने 34 तर जैस्वालने 40 धाव केल्या.

भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (क), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

श्रीलंका संघ : दिनेश चंडीमल, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), पाथुम निसांका, कुसल परेरा, चारिथ असालंका (क), वानिंदू हसरंगा, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, चामिंडू विक्रमसिंघे, बिनुरा फर्नांडो, अशिथा मदशान फर्नांडो, अशिथा मादशान मादशाना , महेश तीक्ष्णा, दुनिथ वेल्लालागे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img