8.9 C
New York

Manoj Jarange Patil : सत्ताधारी, विरोधकांना मनोज जरांगे यांचा इशारा

Published:

छत्रपती संभाजीनगर

सरकारला मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व आहे. त्यामुळे आता 29 तारखेला पाडापाडीचा निर्णय घेतला जाणार. असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला दिला आहे. सध्य जरांगे उपोषण संपल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार घेत आहेत.

मनोज जरांगे म्हणाले की, मी आता रूग्णालयातून सुट्टी घेऊन अंतरवालीकडे निघत आहे. त्यानंतर सगळ्या राज्यातील समाज एकत्र येऊन बैठक ठरवली जाणार आहे. ज्यामध्ये 29 तारखेला सरकारमधील आमदार पाडापाडीचा निर्णय घेतला जाणार आहे. कारण सरकार लक्ष देत नाही. ही चांगली गोष्ट आहे. गर्व हा संपतो गर्वाला कधी वाढ नसते. तर सरकारलां मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, मात्र त्यांनी EWS आणि SEBC सुरू ठेवा. सरकारला जे काही करायचं आहे ते स्पष्टपणे करावं. अशाप्रकारे सरकारने जीवघेणा खेळ मुलांशी खेळू नये. मराठ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय करून इकडे बोंबलत बसायचं. करायचं तर स्पष्ट करायचं शिका, निकष न लावता स्पष्ट द्यायचं शिका. असं म्हणत जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे.

मनोज जरांगे म्हणाले की, शरद पवार काय म्हणतात त्यापेक्षा माझं मन, आणि विचार, संस्कार काय सांगतात ते महत्वाचे आहे. धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. बंजारा समाजाला वेगळा प्रवर्ग करण्याची मागणी आहे. ही माझी प्रामाणिक भावना आहे. आमच्यासह त्यांच्या लेकरांचेही कल्याण झाले तर काय हरकत आहे. आमची भूमिका ठाम आहे. वेळ प्रसंगी सर्व समाजाने एकत्र येऊन विधानसभेत पाडले पाहिजे असे जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करणे ही सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचीही जबाबदारी आहे. मात्र ते दोघे केवळ एकमेकांना बैठकीला बोलावतात. बैठकीला जात नाहीत. मात्र समाजाच्या बळापुढे कोणतीच सत्ता टिकत नाही. त्यामुळे दोघांनीही समाजाच्या बळाच्या नादी लागू नये. समज असा झटका देईल की पश्चाताप करायलाही जागा राहणार नाही असे ते म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले की, आमची धग मराठवाड्यापुरती नाही. मुंबईत देखील आमदारांना बसणे कठीण झाले आहे. चंद्रकांत पाटील यांनी इकडे तोंड खुपसू नयेत गिरीश महाजन आले होते त्यांना विचारा काय झाले होते. असे म्हणत त्यांनी प्रकाश आंबेडकरांवरही निशाणा साधला. प्रकाश आंबेडकर सत्तेत नाही आम्ही देखील नाही मग आम्ही का चर्चा करावी? असा सवाल त्यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img