19.3 C
New York

Maharashtra Governor : महाराष्ट्राला मिळाले नवीन राज्यपाल

Published:

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाकडून मध्यरात्रीनंतर १ वाजता यासंदर्भातील पत्रक जारी करण्यात आले. यात जवळपास 10 राज्यांमधील राज्यपालांच्या बदल्या तसेच फेरनियुक्त्या करण्यात आल्याची माहिती आहे.

Maharashtra Governor महाराष्ट्राला मिळाले नवीन राज्यपाल

रमेश बैस हे महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत. त्यांच्या जागी सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. सी.पी. राधाकृष्णन हे सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. महाराष्ट्रात बदली झाल्यानंतर झारखंडमध्ये संतोषकुमार गंगवार राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.

Maharashtra Governor कोण आहेत सीपी राधाकृष्णन?

पुढच्या काही महिन्यातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधाची सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांच्या जागी सीपी राधाकृष्णन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य आहेत. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. ते तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. राधाकृष्णन यांनी 1998 आणि 1999 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीतही भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती, मात्र, त्यांचा पराभव झाला होता. 18 फेब्रुवारी 2023 रोजी ते झारखंडचे राज्यपाल झाले होते.

अमित शाहानंतर नरेंद्र मोदींवर शरद पवारांचा हल्लाबोल

Maharashtra Governor नवीन नियुक्त्यांची यादी

सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लक्ष्मणप्रसाद आचार्य यांच्याकडे मणिपूरचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे.

गुलाबचंद कटारिया यांची पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. कटारिया यांची जागा आचार्य यांनी घेतली आहे.

कटारिया यांची केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.

हरिभाऊ किसनराव बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

जिष्णू देव वर्मा हे तेलंगणाचे राज्यपाल असतील.

ओम प्रकाश माथूर हे सिक्कीमचे नवे राज्यपाल असतील.

रामेन डेका यांची छत्तीसगडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

सीएच विजयशंकर यांची मेघालयच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

कैलाशनाथन यांची पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या सर्व नियुक्त्या पदभार स्वीकारल्यापासून लागू होतील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img