13.1 C
New York

Guru Waghmare Murder : ‘गुरू वाघमारे’च्या हत्या प्रकरणात पोलिसांकडून गर्लफ्रेंडला अटक

Published:

मुंबई

क्राईमच्या घटना आणि त्यातल्या वेगवेगळ्या धक्कादायक बाजू आपण सातत्यानं पाहतच असतो. मात्र वरळीतल्या एका स्पामध्ये (Worli Spa) झालेल्या मर्डर प्रकरणात चकित करणाऱ्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. वरळीतील स्पामध्ये गुरु वाघमारे याच्या हत्येने मोठी खळबळ उडाली होती. चुलबुल पांडे या नावाने गुरू वाघमारे (Worli Guru Waghmare Murder) हा ओळखला जायचा. या हत्या प्रकरणात आता रोज नवनवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. वरळी पोलिसांनी गुरूसिद्धप्पा वाघमारेच्या गर्लफ्रेंडला अटक (Girlfriend Arrested) केली आहे. गुरूसिद्धप्पाच्या हत्याप्रकरणात त्याच्या मैत्रिणीचा देखील सहभाग असल्याचा पोलिसांना संशय होता. तपास करताना तिचा देखील गुरू वाघमारेच्या हत्येत सहभाग असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणात ही चौथी अटक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरळी पोलिसांनी गुरूसिद्धप्पा वाघमारेची मैत्रीण मेरी जोसेफला अटक केली आहे. मेरी जोसेफ ही गुरु वाघमारेची गर्लफ्रेंड होती. हत्येच्या रात्री गुरू वाघमारेची मैत्रीण मेरी जोसेफ त्याच्यासोबत होती. मेरी आणि गुरू हे वरळीमधील स्पा पार्लरमध्ये रात्री 1 वाजता आले होते. मेरीला गुरूच्या हत्येच्या कटाची माहिती असताना देखील तिने गुरूला स्पामध्ये बोलावल्याचा पोलिसांचा दावा आहे. मेरीने गुरू वाघमारेचे लोकेशन आरोपींसोबत शेअर केल्याचा देखील दावा पोलिसांनी केला आहे.

स्पा आणि मसाज पार्लरकडून खंडणी उकळण्याचा आरोप असलेल्या गुरू वाघमारेच्या जीवाला धोका होता. गुरू वाघमारेने आपल्याला जीवाला धोका आसल्याच्या भीतीने 22 संशयितांची नावे आपल्या दोन्ही पायांवर आणि पाठीवर गोंदवली होती. गुरू वाघमारेच्या हत्येनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली होती. आरोपींमध्ये स्पा मालकांचा समावेश आहे. गुरू वाघमारेची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक केली होती. याप्रकरणी संतोष शेरेकर, फिरोझ अन्सारी आणि शाकीब अन्सारी या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. 4 लाख रुपयांची सुपारी देऊन गुरू वाघामारेची हत्या करण्यात आली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img