अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारकडून घोषणा (Maharashtra Government) केल्या जात आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, लाडका भाऊ आणि आता शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून परिपत्रक काढण्यात आलं असून सदर योजना एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत लागू राहील.
तर या योजनेचा राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं सांगितलं जातंय. तीन वर्षानंतर सदर योजनेचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर ही योजना पुढं चालवायची की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल, असं परिपत्रकात नमूद करण्यात आलंय. 7.5 एचपी पेक्षा कमी क्षमतेचा कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. तर 7.5 एचपी पेक्षा जास्त क्षमतेनं कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार नाही.
शरद पवारांचं ‘या संघर्षावर’ सडेतोड भाष्य
Maharashtra Government महाराष्ट्रात 47 लाख 41 हजार कृषी पंप ग्राहक
राज्यातील शेतकऱ्यांना सध्या कृषी पंपासाठी रात्रीच्या वेळी दहा ते आठ तास आणि दिवसा आठ तास थ्री फेजच्या माध्यमातून रोटेशन पद्धतीनं वीज पुरवठा केला जातो. महाराष्ट्रात 47 लाख 41 हजार कृषी पंप ग्राहक असून सर्वांना महावितरणकडून वीज पुरवठा केला जात असतो. महावितरणाकडून केल्या जाणाऱ्या वीज ग्राहकांपैकी 16 टक्के ग्राहक हे कृषी पंपधारक असून राज्यातील एकूण ऊर्जेच्या वापरापैकी 30 टक्के विजेचा वापर शेतीसाठी केला जातो. तर आता वीज बिलासाठी राज्य सरकार 14 हजार 760 कोटी रुपये महावितरणला दरवर्षी अनुदान म्हणून देणार आहे.