3.6 C
New York

IND vs SL: T20I मालिका, कधी आणि कुठे पाहायची

Published:

निर्भयसिंह राणे

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) दोघेही त्यांच्या संबंधित T20 विश्वचषक 2024 च्या मोहिमेच्या विरोधाभासी समाप्तीनंतर आगामी मालिकेत नव्याने सुरुवात करण्याचा विचार करतील. भारताने विजेतेपद पटकावले असताना, श्रीलंकेने त्यांच्या ग्रुप-स्टेजच्या सामन्यांमध्ये शरणागती पत्करली, ज्याचामुळे त्यांचा संघ लवकर स्पर्धेतून बाहेर पडला. नव्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली T20I मालिकेत दोन्ही संघ आमनेसामने येतील. यजमान श्रीलंकेला काही दिसांपूर्वीच धक्का बसला कारण त्यांचे आघाडीचे गोलंदाज दुष्मनथा चामीरा आणि नुवान तुषारा यांना दुखापत झाल्यामुळे दोन अनुभवी गोलंदाजांची गरज भासू शकते. त्यांच्या जागी असिथा फर्नांडो आणि दिलशान मदुशांका यांची निवड करण्यात आली आहे. वनिंदू हासारंगाच्या जागी कर्णधार म्हणून निवड झालेल्या चारीथ असालंकाकडे कर्णधारपदाची जवाबदारी विजयाने पार पाडणे हे त्याच्यासाठी गरजेचं आहे.

T20 विश्वचषक 2024 नंतर रोहित शर्मा (Rohit Sharma), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), विराट कोहली (Virat Kohli) यांची T20I निवृत्ती आणि जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) अनुपस्थिती असूनही, सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघ बऱ्याच चांगल्या स्थितीत दिसत आहेत. विभागांमधील विविधता आणि पर्यायी खेळाडूंमुळे भारताला एका मजबूत स्थानावर नेऊन ठेवलय.

Suryakumar Yadav :’माझ्या पुढच्या प्रवासासाठी मी खूप उत्साही आहे’, असं का म्हणाले भारताचे नवीन कर्णधार

T20 मालिका कधी सुरु होईल ?

तीन सामन्यांची मालिकेला 27 जुलै, शनिवारपासून सुरुवात होणार आहे. पल्लेकेले (Pallekele) 27,28 आणि 30 जुलै रोजी तिन्ही T20 सामने आयोजित केले जाईल.

कधी आणि कुठे पाहायचे ?

T20 मालिका सोनी स्पोर्ट्स टेन 3 (Hindi), सोनी स्पोर्ट्स टेन 3 HD (Hindi), सोनी स्पोर्ट्स टेन 4 (Tamil & Telugu) आणि सोनी स्पोर्ट्स टेन 4 HD (Tamil & Telugu) द्वारे प्रसारित केले जाईल. सोनी स्पोर्ट्स नेटवर्क हे या मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असेल. तिन्ही T20 सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता सुरु होतील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img