भारत जोडो यात्रेपासूनच राहुल गांधींमध्ये (Rahul Gandhi)बदल होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना भारत जोडो यात्रेमध्ये भेटणारे राहुल गांधी सर्वसामान्य जनतेला त्यानंतरही भेटत असून त्यांचे जगणे समजून घेत आहेत. ते कधी मॅकेनिकला भेटतात, हमालांमध्ये कधी मिसळतात, बांधकाम करणाऱ्या मजूरांबरोबर कधी काम करतात तर कधी मोटरमॅनना भेटतात. या भेटीचे आणखी एक उदाहरण शुक्रवारी सुलतानपूरला पाहायला मिळाले. आज सुलतानपुरला राहुल गांधी हे न्यायालयात हजर राहण्यासाठी गेले असता एका मोचीच्या दुकानात अचानक पोहोचले. यानंतर तेथे जे काही घडले ते प्रचंड व्हायरल होत आहे.सुलतानपुरला खासदार आमदार मानहानीच्या प्रकरणात खरेतर राहुल गांधी न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी आपले म्हणणे नोंदवले.
राहुल गांधी हे आज ( 26 जुलै) सकाळी सुलतानपूरला पोहोचले. त्यांनी कोर्टात हजेरी लावली. त्यानंतर लखनऊ विमानतळाकडे जाताना ते एका मोचीच्या दुकानात थांबले आणि राहुल गांधी यांनी मोचीशी संवाद साधला. कामाबद्दल विचारता विचारता राहुल गांधी यांनी मोचीसोबत बसून चप्पल शिवले. यावेळी तेथील आजूबाजूचे लोक कुतुहलाने पाहत होते.
विधानसभेपूर्वी अजित दादांना मोठा धक्का बसणार
यापूर्वी, राहुल गृहमंत्री अमित शहा यांच्या मानहानीच्या प्रकरणात सुलतानपूरच्या खासदार/आमदार न्यायालयात हजर झाले होते. येथे त्यांनी आपले म्हणणे नोंदवले. न्यायाधीशांना सांगितले- मी निर्दोष आहे. माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले गेले आहे. मी सर्व आरोप फेटाळतो. माझी आणि माझ्या पक्षाची प्रतिमा डागाळण्यासाठी आरोप केले जात आहेत. राहुल सुमारे 16 मिनिटे कोर्ट रुममध्ये थांबले. 12 ऑगस्ट रोजी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.
Rahul Gandhi सोशल मिडियावरील पोस्ट
राहुल गांधीजी एक कुशल आणि कष्टकरी मोची कुटुंबाला भेटले आणि त्यांच्या समस्या ऐकल्या.अशा करोडो कुटुंबांच्या समृद्धीसाठी आम्ही सतत कार्यरत आहोत. त्यांच्यावर होणाऱ्या प्रत्येक अन्यायाचा पराभव करून त्यांना सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देण्याचा आमचा संकल्प आहे. असे ट्विट कॉंग्रेस पक्षाने सोशलमिडिया प्लॅटफोर्म एक्स वर केले आहे. तसेच त्याचे फोटो शेअर केले आहेत. पक्षाने इंस्टाग्रामवरही पोस्ट केले आहे. जे आज प्रचंड व्हायरल होत आहेत. राहुल गांधी यांचे सामान्य जनतेला अशा पद्धतीने भेटणे हा चर्चेचा विषय ठरत आहे.