21.7 C
New York

Rahul Dravid : राहुल द्रविडचा भारतीय कोचला खास मेसेज! गौतम गंभीर भावुक

Published:

भारताचा संघ आज श्रीलंका दौऱ्यामध्ये T२० मालिकेचा पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडिया भारताचे T२० विश्वचषक २०२४ चे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड |(Rahul Dravid) यांच्या कोचिंगमध्ये भारताच्या संघाने विश्वचषक जिंकला आहे. त्यानंतर त्यांचा प्रशिक्षकच कार्यकाळ संपला आणि नव्या प्रशिक्षकाची घोषणा करण्यात आली. आता भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज पहिला सामना खेळणार आहे. गौतम गंभीर आणि राहुल द्रविड हे भारतीय संघाचे गाजलेले माजी खेळाडू आहेत त्याचबरोबर चांगले मित्र सुद्धा. भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठी भारताचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खास संदेश व्हिडिओमार्फत दिला आहे. हा मेसेज ऐकून टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर सुद्धा भावुक झाले.

Rahul Dravid काय म्हणाले राहुल द्रविड?

राहुल द्रविडने गौतम गंभीरसाठी एक खास व्हॉइस मेसेज पाठवला आहे. यामध्ये तो म्हणाला की, “हॅलो गौतम, जगातील सर्वात रोमांचक कामामध्ये तुमचे स्वागत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून माझा कार्यकाळ संपून ३ आठवडे झाले आहेत.” यानंतर द्रविडने बार्बाडोसच्या फायनलचा आणि मुंबईच्या विजयाच्या परेडचा उल्लेख करत या आठवणी अविस्मरणीय असल्याचे सांगितले. यावेळी राहुल द्रविड हे बोलताना गौतम गंभीर व्हिडिओमध्ये भावुक होताना दिसला.

रंगीत ‘परेड ऑफ नेशन्स’ ने बहरले पॅरिस

द्रविड पुढे म्हणाला, “काहीही गोष्टींपेक्षा, मी माझ्या संघासोबत असताना केलेल्या आठवणी आणि मैत्री जपत राहीन. तुम्ही भारताच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे, मला तुमच्यासाठीही अशीच इच्छा आहे.” पुढे, माजी मुख्य प्रशिक्षकाने संघातील खेळाडूंबद्दल बोलले आणि गौतम गंभीरला शुभेच्छा दिल्या.

Rahul Dravid गौतम गंभीर भावुक

भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीर यावेळी भावुक झाला आणि म्हणाला की, मी हे काम पूर्णपणे माझ्याकडून सर्वात्तम करण्याचे प्रयत्न करेल आणि तुम्हाला प्राऊड करण्याचा प्रयत्न करेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img