गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यंनी, आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे, अशी मागणी केली आहे. तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये असे ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे. अशातच या शरद पवार यांनी (Sharad Pawar) या पेचप्रसंगावर तोडगा काढावा, त्यांनी भूमिका स्षष्ट करावी, अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत आहे.
Sharad Pawar काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून बीड आणि जालना जिल्ह्यात अस्वस्थता आहे. लोकांमध्ये कटुता आणि आविश्वासाची भावना आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यावर मी तिथे जाऊन तिथल्यालोकांशी संवाद साधणार आहे. पण असे चित्र मी कधीही पाहिले नाही की ऐकललंही नाही. काहीही करून हे चित्र बदललं पाहिजे.
आरक्षण द्या अन्यथा..” मनोज जरांगेंचा नवा इशारा काय?
“मी कधीही महाराष्ट्रात असं ऐकलेलं नाही. एका समाजाचं हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाचे लोक तिथं चहा घ्यायलाही जात नाहीत, असं मी महाराष्ट्रात कधीही ऐकलेलं नाही. हे काहीही करून बदललं पाहिजे. लोकांमध्ये विश्वास वाढवला पाहिजे. संवाद वाढला पाहिजे. आमच्यासारख्या लोकांनी यासाठी जीव ओतून काम केलं पाहिजे,” अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली. लोकांनी आपापसातील संवाद कायम ठेवला पाहिजे, पण संवादच संपत चालला आहे. सार्वजनिक जीवनात संवाद संपला की गैरसमजूती वाढायला लागतात. त्यामुळे संवाद गरजेचा आहे, असेही शरद पवारांनी सांगितले.
राज्यातील चित्र पाहता समाजात दुर्दैवाने दोन वेगवेगळे गट पडले आहेत. त्या दोन गटांना कोणी-कोणी काहीतरी सांगितले आहे. त्यात राज्यकर्त्यांमध्येही दोन गट पडले आहेत. एका गट ओबीसींच्या बाजूने तर दुसरा मराठा आंदोलकांच्या बाजूने आहे. हे योग्य नाही. पण आपण दोन्ही गटात सामंजस्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या दोन्ही गटातील संवाद वाढवणे गरजेचे आहे,अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली.पण इतक्या दिवसांपासून केंद्र सरकारने या प्रकरणात अजिबात लक्ष घातलेले दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.