4 C
New York

Paris Olympic 2024: रंगीत ‘परेड ऑफ नेशन्स’ ने बहरले पॅरिस

Published:

निर्भयसिंह राणे

पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic 2024) मुळे पॅरिस सध्या एक प्रचंड मोठे अँफिथिएटर झालंय आणि सीन नदीने सर्व खेळाडूंच्या परेडसाठी एक ट्रॅक म्हणून काम केले ज्यात फ्रान्सने त्यांची सांस्कृतिक विविधता, क्रांतीची भावना, उत्कृष्ट कारागिरी आणि वास्तुशिल्पाचा वारसा ह्या उत्साही 33व्या ऑलिम्पिक गेम्समध्ये शुक्रवारी प्रदर्शित केले. ‘परेड ऑफ नेशन्स’ ने प्रक्रियेला सुरुवात करत फ्रान्सच्या परंपरेची एक झलक दर्शविण्यात आली.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक (Thomas Bach) उपस्थित होते व फ्रेंच फुटबॉल माएस्ट्रो झिनेदिन झिदानने (Zinedine Zidane) ऑलिम्पिक ज्योत घेऊन पॅरिसच्या रस्त्यांवर धावतानाचा व्हिडिओ सर्वतर प्रदर्शित केला. सहा किलोमीटरची परेड ऑस्टरलिट्झ ब्रिजपासून सुरु झाली आणि जमलेल्या गर्दीच्या जयजयकारात 85 बोटींनी 6800 अधिक एथलिट्सने प्रवास केला. शनिवारी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमुळे अनेक खेळाडू ह्या अविश्वसनीय कार्यक्रमाचे भाग होऊ शकले नाही.

Harbhajan Singh : ‘टीम इंडीयाने पाकिस्तानात का जावं?’ हरभजनचा सवाल

आगमनाचा क्रम फ्रेंच अल्फाबेट्सनुसार करण्यात आला ज्यात ऑलिम्पिक गेम्सचे अध्यात्मिक घर असलेली ग्रीक टीम प्रथम आली, त्यानंतर रेफ्युजी संघाची एन्ट्री झाली. भारतीय टीमचे नेतृत्व दोन फ्लॅग-बेअरर करत होते – दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता पीव्ही सिंधू (P.V Sindhu) आणि टेबल टेनिसचे दिग्गज ए शरथ कमल (A. Sharath Kamal) यांनी केला व सर्व मिळून 117 खेळाडूंने भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत.

परेड मार्गावर ठिकठिकाणी असलेल्या पुलांमुळे चाहत्यांसाठी नृत्य सादर करण्यात आले, ज्याचे एक लाखाहून अधिक तिकिट्स विकल्या गेल्या आणि विनम्यूल्य तिकिट्स वितरण झाल्याने वेगवेगळ्या ठिकाणी बहुसंख्येने लोकं जमली होती. फ्रेंच आयोजकांनी एक अविस्मरणीय देखावा दर्शवण्याचे वाचन दिले होते, जे त्यांने वचनबद्ध होऊन नियमितपणे पार पाडले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img