8.3 C
New York

Automatic Toll System : आता टोल ऑटोमॅटिक कापला जाणार, जाणून घ्या नेमका कसा ?

Published:

राज्यासह देशभरात टोलचा मुद्दा खूपच गंभीर आहे. अनेकदा वाहन चालकांना टोलसाठी मोठा वेळ खर्ची करून, वाहनाच्या रांगेत थांबावे लागते. मात्र, (Automatic Toll System) आता देशाचे केंद्रीय परिवहन आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील टोलव्यवस्थेबाबत मोठे भाष्य केले आहे. टोलसाठी यापुढे देशातील वाहन चालकांना थांबावे लागणार नाही. वाहनाच्या मीटरप्रमाणे पडलेल्या किलोमीटरच्या आधारे टोल आकारणी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Automatic Toll System कशी असेल ‘ही’ नवीन टोल आकारणी?

नितीन गडकरी यांच्या माहितीनुसार, टोल वसुली करण्याची आताची पद्धत लवकर बदलण्यात येणार आहे. नव नवीन उपग्रह आणि अत्याधुनिक प्रणाली मार्फत टोल वसुली देशभरात सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे वाहन तुम्ही घराबाहेर काढल्यानंतर, नवीन टॅक्स प्रणालीद्वारे तुमचा टोल त्यावेळेपासूनच किलोमीटर नुसार आपोआप कापला जाईल. अर्थात यासाठी तुमचे बँक खाते हे परिवहन विभागाशी जोडले जाणार आहे. विशेष म्हणजे पुढील दोन महिन्यात ही नवीन टोल प्रणाली लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे वाहन चालकांचा वेळ वाचणार आहे.

स्वत: शिवली राहुल गांधीनी चप्पल!

Automatic Toll System ऑटोमॅटिक टोल कापला जाणार

परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, सध्याची टोल व्यवस्था त्यांना पूर्णपणे संपवायची आहे. यापुढे ऑटोमॅटिक टोल कट होणार असल्याचे ते म्हणाले आहे. आगामी दोन महिन्यामध्ये हे सर्व दोन महिन्यांमध्ये सुरु होणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितलं की, बँक खात्यातून पैसे रस्त्याच्या वापरानुसार कट केले जाणार आहेत. केंद्र सरकार आपल्या या नवीन योजनेमुळे टोल मुक्ती करणार असल्याचे त्यांने स्पष्ट केले आहे. ग्राहकांचा वेळ आणि पैसा यामुळे आता वाचणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img