21 C
New York

Prithvik Pratap: “आले तुफान किती…” अखेर ‘या’ अभिनेत्यानं केलं दुसरं स्वप्न पूर्ण

Published:

Prithvik Pratap: छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे. प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणाऱ्या या कार्यक्रमाने कित्येक नवोदितांनाही त्यांचं स्वतःच टॅलेंट दाखवण्याची संधी दिली आहे. आता हास्यजत्रेतूनच अभिनेता पृथ्विक प्रताप (Prithvik Pratap) हा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. पृथ्वीकने अनेक मालिकांमध्ये काम केलंय मात्र, पृथ्विकला हास्यजत्रेने खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. पृथ्विकचा भलामोठा चाहता वर्ग असून तो सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतो. नुकतंच त्याने नवी कोरी कार घेतली आहे.

Prithvik Pratap: सोशल मीडियाच्या माध्यमांतून पृथ्विक नवंनवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सबद्दल चाहत्यांना माहिती देत असतो. महागडी कार घेतल्याची आनंदाची बातमी त्याने चाहत्यांबरोबर शेअर केली. ‘kia’ ही नवीन करकरीत काळ्या रंगाची गाडी पृथ्विकने खरेदी केली आहे. नवीन गाडीचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पृथ्विकच्या चेहऱ्यावर या फोटोमध्ये स्वप्नपूर्तीचा आनंद स्पष्ट दिसत आहे. पृथ्विकने गाडीचे फोटो शेअर करत एक खास पोस्टही लिहिली आहे. पृथ्विकने कॅप्शनमध्ये लिहिलं “पाहिलेल्या स्वप्नांची यादी पूर्ण करण्याच्या प्रवासाला थोडी गती मिळावी म्हणून संयमाची चार चाके जोडतोय. आशिर्वाद आणि प्रेम असू द्या”, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पुढे तो म्हणाला, “पहिलं हे नेहमीच खूप खास असतं, म्हणून…सिरी “आले तुफान किती…” हे गाणं लाव”. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं आहे. तर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता जितेंद्र जोशीने (Jitendra Joshiपृथ्विकच्या पोस्टवर कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. “कर्तुत्ववान आहेस.. सच्चेपणा आणि मेहनत अशीच असू देत…खूप प्रेम”, अशी कमेंट जितेंद्र जोशीने केली आहे.

छायडे! “तु कमाल थी, कमाल है और…”, हेमांगी कवीची ‘ती’ भावुक पोस्ट

दरम्यान, गेल्याच वर्षी पृथ्विकने मुंबईत स्वत:चं हक्काचं घर घेतलं. आणि आता त्याने गाडी घेण्याचं त्याचं दुसरं स्वप्न पूर्ण केलं आहे. पृथ्विकने काही मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘अस्सं माहेर नको गं बाई’ ‘जागो मोहन प्यारे’, या मालिकांमध्ये तो झळकला आहे. ‘क्लास ऑफ ८३’ या हिंदी चित्रपटातही त्याने काम केलं आहे. ‘डिलिव्हरी बॉय’ या मराठी चित्रपटातही तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img