निर्भयसिंह राणे
केंद्र सरकारच्या ह्या वर्षीच्या बजेटमध्ये स्मार्टफोनवरील आयात शुल्क 20% वरून 15% पर्यंत कमी केल्यानंतर Apple ने भारतातील त्यांच्या प्रो iPhone मॉडेल्सच्या किमती 3% ते 4% पर्यंत कमी केल्या आहेत. Apple च्या किमतीतील कपात ₹300 पासून ते, मेड-इन-इंडिया iPhone 13, iPhone 14, iPhone 15 आणि iPhone SE साठी ₹2,300 आणि iPhone 15 Pro साठी ₹6,000 पर्यंत कपात केली आहे. ॲपलने भारतात प्रो व्हेरियंटच्या किमती कमी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
चीनमध्ये iPhones ची मागणी कमी होत असल्याचं दिसत असल्याने किमतींमध्ये कपात करण्यात आली आहे. एका मार्केट रिसर्च फर्मने या आठवड्यात सांगितले की चीनमधील Apple च्या स्मार्टफोन शिपमेंटमध्ये जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत गेल्यावर्षीच्या तुलनेत 6.7% ने घट झाली आहे. संशोधन विश्लेषक लुकास झोन्ग (Lucas Zhong) यांनी लिहिले, ” ॲपलला चीन देशामध्ये भरपूर अडथळ्यांचा सामना करावा लागतोय”
किमतीतील कपात ही जरीही स्वागतार्ह वाटचाल असली तरी, भारतात iPhones बाहेरच्या तुलनेत महाग आहेत, सर्वात स्वस्त iPhone 15 Pro मॉडेल, ज्याची किंमत USA मध्ये $999 आहे, त्याची भारतात किंमत $1550 आहे. Apple साठी भारत एक प्रमुख आंतरराष्ट्रीय मार्केट म्हणून उदयास आलं आहे, जो देशात त्यांचे उत्पादन बेस झपाट्याने वाढवत आहे. मॉर्गन स्टॅनलेच्या म्हणण्यानुसार, 2023 मध्ये Apple चा भारतातील महसूल 42% वाढून $8.7 बिलियन झाला आहे.
Apple ने या वर्षीपासून भारतात त्यांच्या पुढील iPhone Pro मॉडेलचे असेम्ब्ल करण्याची योजना आखली आहे. गुगलने (Google) गेल्या वर्षी जाहीर केले होते की ते देखील 2024 पासून भारतात आपला स्मार्टफोन, पिक्सल लाईन-अपचे उत्पादन भारतात सुरु करेल.