19.7 C
New York

Suryakumar Yadav :’माझ्या पुढच्या प्रवासासाठी मी खूप उत्साही आहे’, असं का म्हणाले भारताचे नवीन कर्णधार

Published:

निर्भयसिंह राणे

शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या T20I मालिका सुरु होण्याआधी, भारताचे नवीन T20I कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) नवीन हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यासोबतच्या त्यांच्या कामासंदर्भात सांगितले की ते खूप उत्साही आहेत नवीन जवाबदारी सांभाळण्यासाठी. जूनमध्ये भारताच्या T20 विश्वचषक विजयानंतर ‘हिटमॅन’ रोहित शर्मांनी (Rohit Sharma) या फॉरमॅटमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर सूर्यकुमार यादव यांनी अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पंड्यांना (Hardik Pandya) भारताच्या नेतृत्वाच्या शर्यतीत मागे टाकून कर्णधारपद मिळवले. गंभीर आणि सूर्यकुमार यांचे फ्रॅंचाईझ क्रिकेटमध्ये फार जुने संबंध आहेत ज्यात दोघे 2014 ते 2017 पर्यंत कोलकाता नाईट रायडर्समध्ये (KKR) कर्णधार आणि उपकर्णधार होते.

“आमचा बॉंड नेहमीच खास राहिला आहे. 2014 पासून आत्तापर्यंत, त्याला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2018 मध्ये, मी दुसऱ्या फ्रॅंचाईझमध्ये सामील झाली आणि ते दुसऱ्या फ्रॅंचाईझमध्ये सामील झाले, परंतु तरीसुद्धा आम्ही खेळाबद्दल नेहमीच बोलायचो. आमचा बॉंड हा नेहमीच खास राहिला आहे आणि त्यांना बरोबर माहित असतं की माझ्या मनात काय चाललंय व काय चुकतंय जे मी सुधारू शकतो. जेव्हा मी काहीही म्हणतो ते त्यांना लगेच समजतं त्यामुळे हा कर्णधार आणि कोच मधलं नातं खूप घट्ट आहे. ह्या माझ्या पुढच्या प्रवासासाठी मी खूप उत्साही आहे”, असं कर्णधार सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेत म्हणाले.

Paris Olympic 2024: रंगीत ‘परेड ऑफ नेशन्स’ ने बहरले पॅरिस

T20I फॉरमॅटमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांची भर कशी पडली जाईल यावर बोलताना सूर्यकुमार यादव यांनी स्पष्ट भूमिका मांडली की, “त्यांची जागा भरणं खूप कठीण आहे, परंतु साहजिकच सर्वच खूप सराव कारत आहेत, नवीन खेळाडू सुद्धा आले आहेत ज्यांनी फ्रॅंचाईझ क्रिकेटमध्ये चांगली भूमिका बजावली. काही भारतासाठी सुद्धा खेळले आणि तिथे चांगले प्रदर्शन दाखवले, त्यामुळे मला विश्वास आहे की नवीन खेळाडू त्यांच्या जागी चांगल्या खेळाचं प्रदर्शन करतील.

पत्रकार परिषदेच्या अखेरीस सूर्यकुमार यांनी असा विश्वास व्यक्त केला की ते मुंबई संघाच्या कर्णधारपदाच्या दरम्यान ज्यात त्यांना आक्षेपार्ह्य भाषा वापरल्यामुळे त्यांना काढण्यात आलं त्याची पुनरावृत्ती नाही होणार ह्याची खात्री दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img