23.1 C
New York

Heavy rain : अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास गेला, भातशेतीचे नुकसान

Published:

कुडाळ तालुक्यात पावसामुळे तब्बल 214 हेक्टर भातशेतीचे (Heavy rain)अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र, वारंवार शेतात पाणी साचत असल्याने पंचनामे करण्यात अडथळे येत होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील पावसाचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात घटले आहे. सद्यस्थितीत तालुक्यात वादळी वारे असले तरी पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. यामुळे तालुक्यातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

भातशेतातील पाणी ओसरल्यानंतर शेतातील विदारक स्थिती समोर आली आहे. तालुक्यातील पावशी भागातील मळ्याचे मळे कुजून वाया गेले आहेत. त्यामुळे आता कृषी विभागाने पंचनाम्याचे काम जोरदार हाती घेतले आहे. तालुका कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात आतापर्यंत सुमारे 415 हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. कृषी विभागामार्फत जरी पंचनामे करण्यात आले असले तरी मिळणारी नुकसान भरपाई ही तुटपुंजीच असते. त्यामुळे शेतकरी वर्गाला शासनाकडून कितपत न्याय मिळणार? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने पूर्वीचे निकष बदलून आता मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

बेलापूरमध्ये चार मजली इमारत कोसळली

दुसरीकडे रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. लागवड केलेली भाताची रोपे पाण्याखालीच राहिल्याने पूर्णपणे कुजली आहेत. डोंगराळ भागातील काही ठिकाणी असलेल्या भातशेतीत माती, चिखल वाहून गेला आहे. पाऊस कमी झाल्यानंतर आता शेतीतील नुकसान दिसू लागले आहे. कृषी विभागाने केलेल्या पाहणीत 746 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. तर काही तालुक्यांतील नुकसानीची पाहणी आणि नोंदी करणे सुरू आहे. राज्य सरकारनेही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यांतील पाहणीचा अहवाल तयार करणे सुरू आहे. सोबतच रायगड जिल्हाधिकाऱ्यांनाही नुकसानभरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक यांच्या मदतीने प्रत्यक्ष स्थळपाहणी करून अहवाल सादर केले जातील. पेण, अलिबाग, रोहा, महाड या तालुक्यांमध्येही नुकसानीची पाहणी करून त्याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. कोकण किनारपट्टीवर गेल्या 15 दिवसांपासून सखल भागातील भातशेतीत पाणी साचल्याने रोपांचे खूप नुकसान झाले आहे.नुकतीच लावलेली रोपे कुजून गेल्याने दुबार लावणीचे संकट ओढवल्याचे शेतकरी सांगतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img