ओतूर,प्रतिनिधी:दि.दि.२७ जूलै ( रमेश तांबे )
जुन्नर (Junnar) तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून रात्रीच्यावेळी अवैध बेकायदेशीर ड्रोन उडवले जाऊन, त्याचा वापर टेहळणी करणे, चोरी करणे, इत्यादी. कामांसाठी केला जात आहे, अशी अफवा काही लोकांकडून सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरवली जात आहे.मात्र नुकतीच नवी मुंबई येथील आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेड या ड्रोन उत्पादक कंपनीने ड्रोनची चाचणी घेण्यासाठी पोलीसांकडे परवानगी मिळावी,यासाठीचे पत्र आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्याकडे दिले असून,अद्याप आळेफाटा पोलिसांनी, या ड्रोन कंपनीला ड्रोनची चाचणी घेण्यासाठी परवानगी दिली नसल्याचे सांगितले आहे.
जुन्नर तालुक्यात मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असून,याबाबत अद्यापही पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले असून, पोलिसांना देखील फिरणाऱ्या ड्रोनबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.आळेफाटा पोलिसांकडे परवानगी घेण्यासाठी आलेल्या आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीकडे पोलिसांनी ड्रोनच्या चाचणी बाबत चौकशी केली,मात्र आमच्या कंपनीने जुन्नर तालुक्यात अद्याप ड्रोन फिरवले नसल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
जुन्नर तालुक्यातील जुन्नर,नारायणगाव व ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गावांमध्ये, मागील काही दिवसांपासून रात्रीच्यावेळी अवैध बेकायदेशीर विनापरवाना ड्रोन उडवले जाऊन, त्याचा वापर टेहळणी करणे, चोरी करणे, इत्यादी. कामांसाठी केला जात आहे, अशी अफवा काही लोकांकडून सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरवली जात आहे,मात्र रात्रीच्यावेळी ड्रोन उडवल्यामुळे, उत्तर पुणे जिल्ह्यात अद्याप पर्यंत कोणतीही चोरीची घटना घडली नसून, नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.तसेच नागरिकांनी ड्रोन बाबत, भीती न बाळगता पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन जुन्नरचे उपविभागीय अधिकारी रविंद्र चौधर व ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी केले आहे.
तुम्हाला नीती आयोगाची कार्य काय माहिती आहे का ?
तसेच विनापरवाना अवैधरित्या रात्रीचे वेळी ड्रोन उडताना आढळल्यास, जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा ११२ नंबर डायल करून माहिती द्यावी. तात्काळ सदर ठिकाणी पोलीस कर्मचारी पाठवले जातील.तसेच अवैद्य,बेकायदेशीर व विनापरवानगी ड्रोन उडवताना कोणताही संशयित इसम नागरिकांना मिळून आल्यास त्यास मारहाण न करता पोलीसांच्या ताब्यात द्यावे.त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे देखील पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
जुन्नर तालुक्यातील, आळेफाटा पोलीस स्टेशन यांच्याकडे नवी मुंबई येथील आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीने चाचणी व सराव घेण्यासाठी पत्र दिले आहे.सदर कंपनीस पोलिसांकडून कोणतीही अधिकृत परवानगी दिली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तालुक्यातील सर्व ड्रोन धारकांनी त्यांची माहिती ( डीजीसीए ) ची परवानगी असल्या बाबतचे सर्टिफिकेट हे जवळच्या पोलीस ठाण्यात तात्काळ जमा करावे. तसेच विनापरवाना कोणत्याही कार्यक्रमांमध्ये ड्रोन उडवू नये तसेच नागरीकांनी खात्री न करता कोणतीही माहिती व्हाट्सअप व इतर सोशल मिडियावर पाठवून,आफवा पसरवू नये, सदर बाबींचे पालन न केल्यास, कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.