23.1 C
New York

Mahayuti : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Published:

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील |(Mahayuti) घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार शनिवारी(27 जुलै) दिल्लीत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत चर्चा होऊ शकते. तसेच जागा वाटपाचे फॉर्म्युला निश्चित होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

महायुतीने आता राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी लोकसभेतील पराभवानंतर सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा येत्या महिनाभरात केव्हाही होऊ शकते.त्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्यला निश्चित करून महायुतीने निवडणुकीच्या कामाला लागण्याची तयारी सुरू केली आहे. विधासनभेसाठी शिंदे गटाने 100 तर अजित पवार गटाने 80 जागांची मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर, स्थानिक भाजप नेते 150 पेक्षा कमी जागांवर लढू नये, अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महायुतीतील तीनही पक्षांचा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी ही भेट असू शकते. दिल्लीतच हा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे.

विधानसभेपूर्वी अजित दादांना मोठा धक्का बसणार

दरम्यान, दिल्लीत गृहमंत्री अमित शाहांची दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी भेट घेतली. ही भेट जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी झाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अजित पवारअगदी दोन दिवसातच पुन्हा दिल्लीत जाणार आहे. महायुतीला लोकसभा निवडणुकीत उमेदवार उशीरा घोषित झाल्यामुळे पुरेसा वेळ मिळाला नाही, काही कारणांमुळे महायुतीला त्यात समन्वयाचा अभाव यामुळे लोकसभेत अपयश आले, असा निष्कर्ष काढण्यात आला. पण विधानसभेला महायुतीच्या नेते जागावाटपासाठी अशी चूक होऊ नये म्हणून आता महत्त्वाची पावले उचलत असल्याचे दिसत आहे.

Mahayuti महाविकास आघाडीतही जागावाटपाला वेग

दुसरीकडे महाविकास आघाडीतही जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. काँग्रेस पक्षाने जागावाटपावर चर्चा करण्यासाठी अधिकृतपणे नेत्यांची निवड केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्याची ताकत जास्त त्याला संबंधित मतदारसंघ हे सूत्र ठरले आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img