आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे (PM Narendra Modi) महत्त्वाची भूमिका पार पडताना दिसत आहे. याचा प्रत्यय जी – 20 परिषद आणि इतर आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये दिसून आला आहे. मागील अनेक महिन्यांपासून रशिया विरुद्ध युक्रेन असे युद्ध सुरु असल्याने तणाव निर्माण झाला आहे. अनेक देशांच्या प्रमुखांची शांततेचे आवाहन केल्यानंतर देखील युद्धाची धगधग सुरु आहे. यामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा भारत देशच मध्यस्थी करु शकतो अशी आशा इतर देशांना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी रशियाचा दौरा केला होता. यानंतर नरेंद्र मोदी हे युक्रेनचा दौरा करणार आहेत.
PM Narendra Modi वोलोडिमिर ज़ेलेंस्की यांची मोदींच्या कृतीवर नाराजी
रशिया व युक्रेन यांच्यामध्ये सुरु असलेल्या विध्वंसक युद्धाचे सावट जगभरावर दिसून येत आहे. यामध्ये झालेली जीवितहानी सर्वांना धक्का देणारी ठरली आहे. युद्धाला एक वर्षे उलटून गेले असले तरी दोन्ही देशामधील तणाव कमी झालेला आहे. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी या महिन्यामध्ये रशिया दौरा केला होता. 8-9 जुलै रोजी नरेंद्र मोदी हे रशियामध्ये गेले होते. भारत-रशिया वार्षिक शिखर संमेलनात पीएम मोदी सहभागी झाले होते. या दोन दिवसीय दौऱ्यावेळी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली होती. यावेळी त्या दोघांनी घेतलेली गळाभेट आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा विषय ठरली होती. याचे कारण म्हणजे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर ज़ेलेंस्की यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती.
आता टोल ऑटोमॅटिक कापला जाणार, जाणून घ्या नेमका कसा ?
PM Narendra Modi हा दौरा का आहे महत्त्वाचा?
यानंतर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युक्रेनचा दौरा करणार आहेत. दिल्लीमधील युक्रेन दुतावासाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मोदी पुढच्या महिन्यात युक्रेनची राजधानी कीवचा दौरा करणार असून युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांची भेट घेणार आहेत. रशियासोबत युद्ध सुरु झाल्यानंतर पहिल्यांदा नरेंद्र मोदी हे युक्रेनने दौरा करणार आहेत. युक्रेनमध्ये त्यांचा 24 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. या दरम्यान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. युद्ध सुरु असलेले असताना नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दोन्ही देशांमध्ये सहमती होण्यासाठी नरेंद्र मोदी प्रयत्न करतील अशी आशा आहे. यापूर्वी मोदींनी दोन्ही देशांना युद्ध थांबवण्यासाठी आवाहन केले होते. शांततेने मार्ग निघू शकतो असे देखील सांगितले होते. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर ज़ेलेंस्की यांच्यासोबत युद्धासंबंधित नरेंद्र मोदी यांनी चर्चा देखील केली होती. त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांचा युक्रेनचा दौरा आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण मानला जात असून युद्ध थांबवण्यामध्ये मध्यस्थीची भूमिका बजावणार का याकडे सर्व देशांचे लक्ष लागले आहे.