21.7 C
New York

Shivneri : शिवनेरी किल्ल्यावर पुढील चार दिवस पर्यटकांना प्रवेश बंदी 

Published:

ओतूर,प्रतिनिधी:दि.२७ जूलै ( रमेश तांबे )

जुन्नर तालुक्यामध्ये गेले चार,पाच दिवसांपासून पडत असलेल्या भिजपावसामुळे दि.२६ रोजी शिवनेरी (Shivneri) किल्ल्यावरील गणेश दरवाजाच्या वरील बाजूस असलेला साधारण सात ते आठ फूट लांब व पाच ते सहा फूट रूंदीचा खडक ढासळून किल्ल्याच्या भातखळा बाजूला खालपर्यंत घसरून आलेला असून गणेश दरवाजालगत असलेली किल्ल्याची आठ ते नऊ फूट लांबीची तटबंदी तुटली असल्याची माहिती जुन्नर चे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी,जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या कार्यालयास कळविण्यात आले आहे.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील चार पाच दिवस अशाच प्रकारे भिजपाऊस चालू राहील असे दिसून येत आहे. त्याअनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी, जुन्नर यांना कळविण्यात येते की, पावसाळयातील पर्यटनासाठी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दि. ३१ जूलै पर्यंत किल्ले शिवनेरी पर्यटनासाठी बंद करून पर्यटकांना किल्ल्यावर प्रवेश बंदी करण्यात येत आहे. तरी येणाऱ्या पर्यटकांस शिवनेरी किल्ल्यावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. 

जुन्नर तालुक्यातील ड्रोन बाबत अद्यापही संभ्रम

 Shivneri जुन्नर तालुका पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने

प्रामुख्याने किल्ले,धबधबा परिसर पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येत असतात.पावसाळयातील पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता दि.३१ जूलै पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले असून सदर आदेशाची अंमलबजावणीची कार्यवाही करणेकामी परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे.

या बाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांवर भारतीय वन अधिनियम १९२७, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व तत्सम कायदे व नियमांतर्गत कारवाई करण्यात येईल,अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तरी पर्यटकांनी किल्ल्याच्या झालेल्या पडझडीचे काम पूर्ण होईपर्यंत तसेच काही दुर्घटना घडू नये म्हणून पुढील आदेश येईपर्यंत शिवनेरी किल्ल्यावर पर्यटनासाठी येऊ नये, असे आवाहन जुन्नरचे वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चव्हाण यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img