23.1 C
New York

Bigg Boss Marathi 5: मोहब्बतें लुटाऊँगा! सुरांच्या बादशाहची घरात होणार ग्रँड एन्ट्री

Published:

Bigg Boss Marathi 5: अख्या महाराष्ट्राचा आवडता शो बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन (Bigg Boss Marathi Season 5) आता अवघ्या काही तासांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात आता कुणाची एन्ट्री होणार याची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे. बऱ्याच कलाकारांची नावं सध्या समोर येत असून कलर्स वाहिनीकडून नॉन रिव्हिल प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे सिझन पाचव्याचे स्पर्धक हे बिग बॉसच्या घरात दाखल झाले असून आता लवकरच घरात कोणता राडा पाहायला मिळणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.

Bigg Boss Marathi 5: नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये सुरांच्या बादशाहची एन्ट्री होणार आहे. पण हा सुरांचा बादशाह नेमका आहे तरी कोण ? हे येत्या 28 जुलै रोजी कळेलचं. पण अनेक गायकांच्या नावाची चर्चा रंगली असून यामध्ये गायक अभिजीत सावंतचं (Abhijeet Sawant) नाव सर्वात जास्त चर्चेत आहे. त्यामुळे आता अभिजीत सावंतच बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार की कोणता दुसरा स्पर्धक असणार हे काही तासांतच पक्क स्पष्ट होईल.

“आले तुफान किती…” अखेर ‘या’ अभिनेत्यानं केलं दुसरं स्वप्न पूर्ण

‘परदेसी गर्ल’ची एन्ट्री
‘बिग बॉस सिझन ५’च्या घरात एका परदेशी अप्सरेची एन्ट्री होणार आहे. बिग बॉसच्या अधिकृत इंस्टाग्रामवर बिग बॉस मराठीचा नाव प्रोमो शेअर करण्यात आला आहे. एक सुंदरी या नवीन प्रोमोमध्ये दिसत आहे. एका परदेशी अप्सरेची एन्ट्री होणार असल्याचं बिग बॉस मराठी या प्रोमोमध्ये सांगण्यात आलं आहे. या प्रोमोमुळे बिग बॉसप्रेमींची उत्सुकता जास्तच वाढली आहे. बिग बॉसच्या घरात या परदेसी गर्लची एन्ट्री किती खास असणार, हे लवकरच पाहायला मिळणार आहे.

रितेश भाऊमुळे ‘बिग बॉस’ होणार आणखी ग्रँड
काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस मराठी’चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला. रितेश भाऊमुळे (Ritesh Deshmukh) ‘बिग बॉस’ आणखी ग्रँड होणार असल्याचं या प्रोमोवरुन स्पष्ट झालं. अशातच आता पुन्हा एकदा नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा सुपरस्टार रितेश देशमुख यंदाचा सीझन वाजवायला सज्ज आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img