23.1 C
New York

Harbhajan Singh : ‘टीम इंडीयाने पाकिस्तानात का जावं?’ हरभजनचा सवाल

Published:

पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 ला पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाला पाकिस्तानात जावे लागणार आहे. मात्र बीसीसीआयने टीम इंडियाला (Team India) पाकिस्तानात (Pakistan) पाठवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात टीम इंडियाचा माजी फिरकीपट्टू हरभजन सिंहने (Harbhajan Singh) चॅम्पियन्स ट्रॉफीवरून पाकिस्तानला सुनावले आहे. मुद्दामून वाईट बोलतात कारण त्यांचं दुकान यावरच चालतं. असं काही तरी प्रक्षोभक बोलून कमाई करता येते. म्हणून स्वत:मध्ये सुधारणा करण्याऐवजी हे क्रिकेटर्स भारतीय क्रिकेटर्सबद्दल उलट-सुलट बोलत असतात. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर तनवीर अहमदने भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या बाबतीत जाहीरपणे उद्धट वर्तन केलं. शिवीगाळ करण्यापर्यंत तनवीरची मजल गेली.

तनवीरने हरभजनला आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शिवी दिली. त्याला टुकार माणूस म्हटलं. “हरभजन स्वत: पाकिस्तानी खेळाडूंना भेटतोय, मग तो भारतीय टीमने पाकिस्तानात जाऊ नये असं का म्हणतो?” असा सवाल तनवीर अहमदने विचारला. हरभजनने एक वक्तव्य केलं, त्यावर तनवीरने अशी रिएक्शन दिलीय. भारतीय टीमच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करुन चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात टीम पाठवू नये, असं हरभजनने म्हटलं होतं.

ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन सोहळा स्टेडियमच्या आत नव्हे

Harbhajan Singh ‘पाकिस्तानात का जावं?’

हरभजनने IANS ला एक इंटरव्यू दिला, त्यात त्याने विचारलेलं की, भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात का जावं?. पाकिस्तानातील परिस्थिती ठीक नाहीय. दरवेळी तिथे काही ना काही घडत असतं. बीसीसीआयच्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे. तथापि, पाकिस्तानचे म्हणणे आहे की ते टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्येच होतील याची ते नक्की दक्षता घेतील. आणि संपूर्ण स्पर्धेदरम्यान भारतीय संघ त्याच हॉटेलमध्ये थांबेल, कारण एकाच शहरात राहून पुरेशी सुरक्षा व्यवस्था करणे सोपे जाईल, असेही सांगण्यात आले.पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास भारत सरकार परवानगी देत नसल्याचे कारण देतं बीसीसीआयने नकार दिला आहे. याउलट बीसीसीआयने हायब्रीड पद्धतीने स्पर्धा खेळवण्याचे सुचवले होते. पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास भारत सरकार परवानगी देत नसल्याचे कारण देतं बीसीसीआयने नकार दिला आहे. याउलट बीसीसीआयने हायब्रीड पद्धतीने स्पर्धा खेळवण्याचे सुचवले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img