3.6 C
New York

Uddhav Thackeray : भाजपच्या ‘या’ नेत्याने दिले ठाकरे भाजपच्या मनोमिलनाचे संकेत

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Elections) महायुतीला (MahaYuti) मोठा फटका बसला होता. विशेषता भाजपला (BJP) लोकसभा निवडणुकीत हवं तसं यश मिळाले नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections) पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न भाजपकडून (BJP) करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच भाजपचे नेते दादा मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली आहे. नुकताच पार पडलेल्या राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनात दरम्यान देखील चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे यांनी लिफ्ट मध्ये एकत्रित प्रवास केला होता. त्यावेळी देखील भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार यावर चर्चा रंगल्या होत्या.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रत्यक्ष भेटूनच शुभेच्छा द्यायला मला आवडेल. मी त्यांना मेसेज करेल. मात्र अशा मोठ्या नेत्याचा वाढदिवसाच्या दिवशी फोन लागत नाही. त्यामुळे माध्यमांसमोरच मला त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची संधी मिळाली. याबद्दल मी माध्यमांचे आभार मानतो. त्यांना खूप चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो. असं म्हणत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून शुभेच्छा देण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चांना उधाण आलय.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, दरम्यान या अगोदर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना देखील चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत हे एकत्र आले होते. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विधान भवनातील कार्यालयात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली होती. यावेळी चंद्रकांत पाटलांनी ठाकरे गटाच्या सर्व आमदारांचे स्वागत केलं. यावेळी देखील त्यांनी आपण एकत्र यायला हवं असं वक्तव्यही केलं होतं.

मुंबई पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक लढवत असलेले ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना निवडून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी देखील राज्याच्या राजकारणात नेमके काय बदल होणार याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. तसेच राज्याच्या राजकारणात विधकांनी एवढ्या आपुलकीने भेटून एकमेकांची विचारपूस करणे हे देखील कित्येक दिवसांनी पाहायला मिळाल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने वेगळेच संकेत मिळत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img