21 C
New York

Pune Rain : पुण्यात पावसाची उसंत

Published:

राज्यात गेल्या आठवड्यापासून सर्वत्र पाऊस सुरु होता. (Pune Rain) परंतु गुरुवारी पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ माजवला. पुणे जिल्ह्यात पावसामुळे लष्कर आणि एनडीआरएफच्या टीमला बोलवावे लागले होते. आता शुक्रवारी सकाळी परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. पावसाने विश्रांती घेतली असून अनेक भागांतील पाणी ओसरले आहे. पुण्यात गुरुवारी एकाच दिवसात 7 जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईत शुक्रवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईतील शाळा, महाविद्यालये आज सुरु राहणार आहे. परंतु पुण्यासह आठ ठिकाणी सुट्टी असणार आहे.

Pune Rain पुणे, पिंपरीतील शाळा, महाविद्यालयाना आज सुट्टी

पुण्याला हवामान विभागाने शुक्रवारी आज (ऑरेंज अलर्ट) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माध्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. सुट्टीच्या कालावधीत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे अशा ही सूचना केल्या आहेत.

राज्यात पावसाचा जोर कायम राहणार, वाचा कुठं कोणता अलर्ट?

Pune Rain खडकवासला धरणातून विसर्ग कमी

पाण्याचा विसर्ग पुन्हा खडकवासला धरणातून करण्यात कमी आला आहे. केवळ 13000 क्युसेक पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून आता होत आहे. पाण्याचा विसर्ग 31 हजार क्यूसेकवरून कमी करत तो केवळ 13 हजार क्युसेक करण्यात आला आहे. प्रशासनाकडून हा निर्णय खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस थांबल्याने घेण्यात आला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img