23.1 C
New York

Sanjay Raut : ‘राज ठाकरेंची नुकतीच भारतात एन्ट्री; नक्की राऊत म्हणाले तरी काय

Published:

राज ठाकरे यांनी काल (दि.25) आगामी विधानसभेसाठी एकला चालो रेचे संकेत दिले आहेत. त्यानंतर राजकारणातील अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, उबाठाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) राज यांच्या बदललेल्या भूमिकेवरून टोला लगावला आहे. राज यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आणि आता एका महिन्यात त्यांची भूमिका बदलतेय हे आश्चर्यकारक असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. (Sanjay Raut On Raj Thackeray)

Sanjay Raut त्यांना परिस्थिती समजून घ्यायला वेळ लागेल

राज यांच्या बदलेल्या भूमिकेवर बोलताना राऊत म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे हे नुकतेच परदेशातून आलेले आहेत. बराच काळ ते परदेशात होते, त्यामुळे या राज्यात काय चाललंय हे समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल असा टोला राऊतांनी राज ठाकरेंना लगावला. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बिन शर्ट पाठिंबा दिला होता, शर्ट काढून उघडा पाठिंबा दिला होता असं उद्धव ठाकरेंनी तेव्हा हे सांगितलं होतं. जणू काय महाराष्ट्रावरती फार काय उपकार करण्यासाठी मोदी आणि शहांचा जन्म झालाय. ज्या मोदी शहांना महाराष्ट्रात पाय ठेवून देणार नाही असं ते म्हणाले होते त्यांना यांनी बिन शर्ट पाठिंबा दिला यातच सगळं आल्याचे राऊत म्हणाले. मात्र, आता एका महिन्यात त्यांची भूमिका बदलतेय आणि ते आता 288,225 काय त्या जागा लढणार आहेत हे आश्चर्यकारक आहे.

मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढणार की नाही?

Sanjay Raut भूमिकांवरही उपस्थित केले प्रश्न

महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकुन करण्यासाठी, महाराष्ट्रातील स्वाभिमानी पक्षांना ही पावलं उचलली जात आहेत का हे पाहावं लागेल असेही राऊत म्हणाले. काही पक्ष, काही संघटना, काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी निर्माण झालेली आहेत, त्यामुळे यावर फार काही बोलण्यात आता अर्थ नाही असे राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img