8.7 C
New York

Rain Alert : राज्यात पावसाचा जोर कायम राहणार, वाचा कुठं कोणता अलर्ट?

Published:

राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. (Rain Alert) गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील प्रमुख शहर पावसाने झोडपून काढली आहेत. पुणे मुंबईत तर अतिवृष्टी झाल्याचं चित्र आहे. (Rain) दरम्यान, आणखीही हा मेघराज्या काही थांबण्याचं नाव घेत नाही. पुण्यात (Pune) अनेक परिसरात पाणी शिरल्याने नागरिकांच स्तलांतर करण्याची वेळ आली आहे. हीच परिस्थिती मुंबईतही आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Rain Alert कुठल्या भागात मुसळधार

रायगड, रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पावसाचा ऑरेंज अलर्ट मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना जारी करण्यात आला आहे. त्याचबरोब रपावसाचा यलो अलर्ट धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Rain Alert पुण्यात ऑरेंज अलर्ट

पुणे शहर परिसरात काल आणि परवा रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाच्या पाण्याचा मोठा फटका पुणे शहरासह लगतच्या गावांना बसला आहे. पाणी साचल्याच्या घटना अनेक ठिकाणी समोर आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा पाण्याच्या विसर्ग वाढवण्यात आल आहे. यामुळे मुठा नदी पात्र देखील दुधडी भरून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. दरम्यान, आजही पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुण्याच्या मदतीला धावून आलं लष्कर

Rain Alert शाळांना सुट्टी

येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माध्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा २६ जुलै रोजी बंद ठेवाव्यात असं जिल्हाधिकारी यांनी म्हटलं आहे.

Rain Alert मदत कार्य सुरू

या सोसायट्या एकता नगर परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर पाण्याखाली गेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर पाणी सिंहगड परिसरातील निंबजनगर परिसरातील सोसायट्यांमध्ये देखील साचलं आहे. सिंहगड परिसरातील या सोसायट्यांमध्ये पाणी साचलं होतं. त्यानंतर बचावकार्य सुरू केलं आहे. खडकवासल्यातून होणारा विसर्ग कमी केल्याने साचलेलं पाणी ओसरण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, भारतीय सैन्यदल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पीएमआरडीएचे पथक सर्वत्र मदत करण्यासठी कार्यरत आहेत.

Rain Alert उपमुख्यमंत्री पवारांच्या सूचना

जेथे पाण्याच्या टाकीत पुराचे पाणी शिरले, तिथे टँकरद्वारे पुरवठा
धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग नियंत्रित करून नियंत्रण
बाधितांच्या घरी शिधा पोहोचविण्यात येईल
स्थलांतरीत नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरवा
अतिवृष्टीत जखमी व्यक्तींचा उपचार खर्च शासनातर्फे
नैसर्गिक संकटात स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे
प्रभावित भागातील नागरिकांना अन्न व पाणी द्यावे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img