21 C
New York

Pune Rain : भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी ओढले फडणवीसांच्या कामावर ताशेरे

Published:

पुणे

महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी समजली जाणाऱ्या पुणे (Pune) शहरात व जिल्ह्यात आज पावसाने हाहाकार उडाल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे (Pune Rain) सकाळपासूनच पुण्यातील विविध भागांत पाणी साचलं होत, तर काही भागांतील घरांमध्ये नागरिक अडकले होते. या भागात एनडीआरएफ (NDRF) व अग्निशमनच्या जवानांनी धाव घेत नागरिकांना घरातून बाहेर काढले. मात्र, आजच्या पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांच्या डोळ्यातही पाणी तरळल्याचं पाहायला मिळालं. कारण, अनेकांच्या घरात पाणी शिरलं असून मोठं नुकसानही झालं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे असलेल्या जलसंपदा खात्याने कोणतीही पूर्वसूचना न देता खडकवासला धरणातून पाणी सोडल्याचा दावा पुणेकरांनी केला. परंतु, पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohal) यांनी जलसंपदा विभाग (Jalsampada Vibhag)आणि महापालिका प्रशासनावर पुराचं खापर फोडलं आहे. मोहोळ यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचंही म्हटलं आहे.

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ही धरणं 100 टक्के भरली होती. त्यामुळे खडकवासला धरणातून गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं. अधिकाऱ्यांनी पहाटे 35 हजार क्युसेक पाणी येत असल्याची माहिती दिली होती. यामुळे पुण्याच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ, लष्कराची मदत घेण्यात आली. पूरग्रस्त कुटुंबियांच्या भेटी घेतल्यानंतर मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. जर 35 हजार क्युसेक पाणी सोडलं असतं तर पूर आला नसता, असं म्हणत याप्रकरणाची चौकशी करणार असल्याचं मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं. खऱ्या अर्थाने जलसंपदा खात्याचं प्रशासन आणि महापालिकेच्या प्रशासनात समन्वयाच्या अभाव दिसून आला. तुम्ही ५५ हजार क्युसेक पाणी सोडणार होतात तर त्याची माहिती देणं अपेक्षित होतं. लोकांना यासंदर्भात सावध करणं आवश्यक होतं. हे सगळं कुठल्याही प्रकार खपवून घेतलं जाणार नाही. याची निश्चितपणे चौकशी करु. मला सकाळी ५५ हजार क्युसेक पाणी सोडल्याची माहिती मिळाली होती. जर ३५ हजार क्युसेक पाणी सोडलं असतं तर पूर आला नसता. त्यामुळे आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाही. याची चौकशी होणार आहे, असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img