19.3 C
New York

Kargil Vijay Diwas : पंतप्रधान युद्ध स्मारकावर जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार

Published:

कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्याचा आज कारगिल विजय दिवस. (२६ जुलै रोजी, १९९९) च्या (Kargil Vijay Diwas ) आजचा ऐतिहासिक दिवस म्हणून संपूर्ण देशात ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो. (Kargil Vijay Diwas ) या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिलला भेट देणार आहेत. (PM Modi) तेथे कारगिल युद्ध स्मारकावर जाऊन कारगिल युद्धात शहीद झालेल्या शूर जवानांना श्रद्धांजली अर्पण करतील. आज सकाळपासून कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कारगिल युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Kargil Vijay Diwas शिखरांवर तिरंगा फडकवला

आपण दरवर्षी २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो. २६ जुलै रोजी, १९९९ च्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्याचा ऐतिहासिक दिवस म्हणून संपूर्ण देशात हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो. कारगिलच्या उंच टेकड्यांवर घुसखोरी करून पाकिस्तानी सैनिकांनी आपलं तळ बनवलं होतं. भारतीय लष्कराला याची कल्पनाही नव्हती. पण, भारतीय जवानांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांना हुसकावून लावलं आणि कारगिलच्या शिखरांवर तिरंगा फडकवला.

पुण्याच्या मदतीला धावून आलं लष्कर

Kargil Vijay Diwas पर्वतीय चौक्यांवर नियंत्रण

भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरु होतं. भारताने ऑप्रेशन विजयची सुरुवात कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोकण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी केली. टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध ठरलं. २६ जुलै १९९९ रोजी लष्कराने पाकिस्तानवर भारताचा विजय घोषित केला. जेव्हा भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलेल्या पर्वतीय चौक्यांवर नियंत्रण मिळवलं तेव्हा कारगिल युद्ध संपलं.

Kargil Vijay Diwas स्वत: पंतप्रधान उपस्थित

भारताचे पंतप्रधान या दिवशी इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतात. तर कधी युद्ध स्मारकावर जाऊनही श्रद्धांजली वाहिली जाते. देशाला बाहेरील धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी देशभरात उत्सवांचं आयोजन देखील केलं जातं. शहीदांच्या कुटुंबीयांचंही स्मृती सभेत स्वागत करण्यात येतं. या वर्षी कारगिल विजय दिवसाचा २५ वा वर्धापन दिन असल्याने, युद्ध स्मारकावर स्वत: पंतप्रधान जाणार असून तेथे ध्वजारोहण समारंभासाठी विशेष कार्यक्रमांचंही नियोजन करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img