21 C
New York

Phir Aayi Hasseen Dillruba: ‘फिर आयी हसीन दिलरुबा’चा दमदार ट्रेलर एकदा पहाच!

Published:

Phir Aayi Hasseen Dillruba: ‘हसीन दिलरुबा’ (Hasseen Dilruba) या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. तापसी पन्नू,(Tapsee pannu) विक्रांत मेस्सी (Vikrant Messy) यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात आदित्य श्रीवास्तवचीही (Aditya Shrivastav) उत्तम भूमिका होती. ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट २०२१ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. अशातच आता ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ (Phir Aayi Hasseen Dillruba) या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर २५ जुलैला गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. उत्कंठा, थरार, गूढ या सगळ्या भावना या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. या सिक्वेलमध्येही प्रेक्षकांना आवडतील अशा गोष्टी आहेत.

‘फिर आयी हसीन दिलरुबा’च्या ट्रेलरमध्ये काय?
Phir Aayi Hasseen Dillruba: रिशू सक्सेना कहा हैं? हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला इक हसीना थी हे ‘कर्ज’ या चित्रपटातलं गाणं वाजतं. पुन्हा एक दमदार लव्हस्टोरी आणि गूढ, रहस्य हे सगळं घेऊन हा चित्रपट परत आला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन कनिका धिल्लो यांनी केलं आहे. “जो पागलपन की हदसे ना गुजरे वो प्यार ही क्या? क्यूँ की होश मे तो रिश्ते निभाये जाते हैं.” असा संवाद राणीच्या म्हणजेच तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार या ट्रेलरमध्ये दिसतो आहे. ज्याचं नाव आहे जिमी शेरगील. तो कोणत्या भूमिकेत आहे हे पण (Phir Aayi Hasseen Dillruba) च्या ट्रेलरमध्येचं पाहायला मिळतंय. जर प्रेक्षकांनी पहिला चित्रपट पाहिला असेल तरच त्यांना सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थातच आदित्य श्रीवास्तवही यात आहेच. काय काय घडतं? आधीच्या घटनेचं काय कनेक्शन आहे? असं सगळंच या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे. ट्रेलरने उत्कंठा निर्माण केली आहे. ९ ऑगस्टला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलिज होणार आहे.

‘धकधक गर्ल’ने बनवली कांदाभजी! व्हिडिओ पहाच

तीन वर्षांनी येतो आहे सिक्वेल
Phir Aayi Hasseen Dillruba: अगदी तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटाचा सिक्वेल तयार झाला करण्यात आला आहे. आता हा लवकरच ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तापसी पन्नूसोबत जिमी शेरगिल, विक्रांत मेस्सी आणि सनी कौशल हे सर्व कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर कालच रिलीज झाला आहे. फिर आयी हसीन दिलरुबा ( Phir Aayi Hasseen Dillruba ) चित्रपट ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) ९ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या सिनेमाची लिंक
‘हसीन दिलरूबा’ या चित्रपटात दिलरुबा अर्थात राणी जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की, तिला पकडण्यात पोलीसही अपयशी ठरले. मात्र, या प्रकरणातून पोलिसांनी अद्यापही हार मानलेली नाही. यावेळी राणीला पकडण्याची जबाबदारी जिमी शेरगिलने घेतली आहे. ‘फिर आयी हसीन दिलरुबा’चा ( Phir Aayi Hasseen Dillruba ) मचवणारा ट्रेलर रिलीज करत निर्मात्यांनी म्हटलं आहे की, यावेळी चित्रपटाची कथा ही आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असणार आहे. विक्रांच मेस्सी आणि तापसी पन्नू त्याच भूमिकेत दिसणार आहेत, मात्र यावेळी हर्षवर्धन राणेची जागा विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने घेतली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img