शंकर जाधव, डोंबिवली
कारगिल विजय दिनाला (Kargil Vijay Diwas) 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नागरी संरक्षण संघटना व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 27 तारखेला डोंबिवलीतील शहीद कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारक येथे शौर्याजली अर्पण करून 25 वा कारगिल विजय दिन साजरा केला.
कारगिल युद्धात देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी नागरी संरक्षण संघटना, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाउन, आरएसपी , पोलीस दल आणि डोंबिवलीकर डोंबिवलीतील शहीद कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारक येथे शौर्याजली अर्पण करून 25 वा कारगिल विजय दिन साजरा केला. याप्रसंगी कारगिल युद्धाच्या स्मृती जागवत डोंबिवलीतील जेष्ठ इतिहास संकलक चंद्रकांत जोशी यांनी युद्धाची पार्श्वभूमी आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्या सैन्यदलाने शौर्याची पराकाष्ठा करत पाकिस्तानला सपशेल नमवून मिळवलेल्या निर्विवाद विजयाचे स्मरण केले.
याप्रसंगी नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणेचे उपमुख्य क्षेत्ररक्षक बिमल नथवाणी , मानपाडा विभाग विभागीय क्षेत्ररक्षक हनुमान चौधरी, अनिल शेलार, डॉ भाविन कोटक, अशोक धांधा, यांच्यासह अनेक स्वयंसेवक त्याचप्रमाणे युनायटेड नेशन्सचे भारताचे प्रतिनिधि डॉ. नेहाल मयूर, रोटरी क्लबचे किशोर अढळकर ,आरएसपीचे मणिलाल शिंपी आणि डोंबिवली चे प्रतिष्ठित नागरिक व इतिहास संकलक चंद्रकांत जोशी, गंगाधर पुरंदरे , केशव राऊत यांच्यासह अनेक नागरिक आणि पोलीस दलाचे कर्मचारी देखील सहभागी झाले होते.