सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. (Rain Update) या पावसामुळे निर्माण होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूरप्रवण व दरडग्रस्त पाटण, महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील सुमारे सातशे लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे सर्व शाळा व महाविद्यालयांनाही सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत संबंधित शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचं कामकाज करावं लागणार आहे.
कोयना कण्हेर आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं, प्रशासनाच्या सूचनेनुसार तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावं, असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलं आहे. दरम्यान, वाईत एक महिला ओढ्याच्या पुरात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सलग आठवडाभर पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणात एका दिवसात सात टीएमसीने पाण्यात वाढ झाली आहे. परिणामी, सुरक्षिततेसाठी दरडप्रवण तसंच नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. आतापर्यंत पाटण तालुक्यातील १५, महाबळेश्वर तालुक्यातील २५, तर जावळी तालुक्यातील सहा गावांतील सुमारे सातशे लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
Rain Update शाळा महाविद्यालयांना सुट्टी
हवामान विभागाने जिल्हा तसंच घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खासगी प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
Rain Update आलमट्टी धरण
आलमट्टी जलाशयातूनही आज २६ दरवाजांतून तब्बल दोन लाख २५ हजार क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. महाराष्ट्रातील धरण क्षेत्रासह कोल्हापूर, सांगली, चिक्कोडी भागात पावसाचा जोर वाढल्याने व महाराष्ट्रातील काही धरणांतून विसर्ग करण्यात येणार असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आलमट्टीत दोन लाख क्युसेक आवक सुरू आहे.
Rain Update पाणीसाठा
कोयना धरणात ७८.२९ टीएमसी पाणीसाठा
धरणातून २१ हजार क्युसेक विसर्ग सुरू
मोरगिरी विभागात आठ गावे संपर्कहीन
जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर बंदी
कण्हेरमधून १५ हजार क्युसेक विसर्ग
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ
लिंब- गोवे (ता. सातारा) येथील कोटेश्वर मंदिर पाण्याखाली
वीर धरणातून विसर्ग सुरू
धरण क्षमता (टीएमसी) सद्य:स्थितीत साठा
कोयना १०५.२५ ७८.२९
धोम १३.५० ७.३१
कण्हेर १०.१० ८.३३
उरमोडी ९.९६ ५.४४
तारळी ५.८५ ४.९१
धोम बलकवडी ४.०८ २.९२