19.7 C
New York

Uddhav Thackeray : भाजपला राम राम करत आमदारांनी बांधले ‘शिवबंधन’

Published:

मुंबई

शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे (Ramesh Kuthe) यांनी भाजपला (BJP) मोठा धक्का देत अखेर शिवसेना पक्षात घरवापसी केली आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena) चांगलं यश मिळालं असून महाविकास आघाडीने तब्बल 30 जागा जिंकून मोठा विजय मिळवला. त्यामध्ये, ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे 9 खासदार निवडून आल्याने उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) शिवसेना पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. महाविकास आघाडीच्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी आता विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश केले जात आहेत. आता, शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या माजी आमदाराने पुन्हा घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, गोंदियातील (Gondia) विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.

रमेश कुथे यांनी 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता सहा वर्षानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करुन घरवापसी केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश झाला. रमेश कुथे हे 1995 आणि 1999 असे दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यानंतर, मात्र 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा काँग्रेस पक्षाचे गोपालदास अग्रवाल यांच्याकडून पराभव झाला होता. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण, गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज होते. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची देखील भेट घेतली होती. त्यामुळे, ते लवकरच काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील अशी चर्चा होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img