21 C
New York

MLA Disqualification : ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करा!; शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टात धाव

Published:

मुंबई

आमदारांच्या अपात्रतेबाबत (MLA Disqualification) शिंदे गटाचा (Eknath Shinde) पुन्हा हायकोर्टात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. शिंदे गटाने (Shinde Group) हायकोर्टाला तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली आहे. उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी भरत गोगावलेंनी याचिका केली आहे. आमदार अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. न्यायालयाने त्यावर 6 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Elections) आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेऊन उबाठाच्या आमदारांना अपात्र करावे, अशी विनंती याचिका शिवसेना प्रतोद भरत गोगावले (Bharatshet Gogawale) यांनी केली आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबर ते डिसेंबर 2023 या कालावधीत शिवसेना आमदार अपात्रतेवर सुनावणी पूर्ण झाली. त्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी जाहीर केला. राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना दिलासा देतानाच, ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले नाही. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवल्यामुळे आता भरत गोगावलेंनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आमदारांचा कार्यकाल संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती गोगावलेंनी याचिकेत केली आहे. मात्र शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवर आक्षेप आहे.

भरत गोगावले म्हणाले की, व्हिप न पाळणाऱ्या उबाठा आमदारांविरोधात आम्ही अपत्रातेची याचिका दाखल केली होती. त्यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती याचिका माननीय उच्च न्यायालयात केली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. त्यामुळे खरी शिवसेना आम्हीच आहोत. उबाठा शिवसेना नाही. ठाकरे गटाच्या आमदारांनी आमच्या व्हिपचे पालन केलेले नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी अपात्रतेचा निर्णय झाला नाही तर ही याचिका निष्प्रभ ठरले. त्यामुळे निवडणुकीपूर्वी उच्च न्यायालयाने अपात्रतेवर निर्णय द्यावा, असे आमदार गोगावले यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img