Corn Benefits: पावसाळा सुरु झाला की आपण लोणावळा जातो आणि मग लोणावळा गेलो की मस्तपैकी मकेवाल्याची गाडीपण रस्त्यात दिसते. अशातच पावसाळ्याच्या दिवसात मक्याचे दाणे खाण्याचा आनंद काही औरच असतो. प्रत्येक ठिकाणी आपल्याला मक्याचे स्टॉल दिसतात. तिखट-मीठ आणि लिंबू लावलेले मके पाहिल्यानंतर तोंडाला लगेच पाणी सुटतं. आणि ते खाण्याचा मोह काही आवरला जात नाही. (Monsoon Special Health Benefits of Corn or Bhutta) चटपटीत मका खाणं जिभेला जितकं सुखावणारं वाटतं तितकंच मका तब्येतीसाठीही उत्तम ठरतो. चला तर मग मक्याचे कणीस खाण्याचे फायदे समजून घेऊया.
रोज रिकाम्या पोटी आल्याचे पाणी प्या, जाणून घ्या ‘५’ फायदे
1) Corn Benefits: मक्याला कार्बोहायट्रेट उर्जेचे प्रमुख स्त्रोत मानले जाते. मक्यात कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. मका खाल्ल्यानं पोट भरगच्च राहतं याशिवाय भरपूर उर्जा मिळते. मक्क्यामधले कार्ब्स आपल्या शरीरात शोषले जातात आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि उर्जा टिकून राहण्यास मदत होते.
2) मक्यामध्ये फ्लेवोनॉईड्स आणि एंटी ऑक्सिडेंटस भरपूर असतात. यामुळे कॅन्सरचा धोका कमी असतो. यातील एंटीऑक्सिडंस हानिकारक फ्री रेडिकल्स कंपाऊंडच्या नकारात्मक प्रभावांना निष्क्रीय करून टाकतात. ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. याशिवाय मक्यात फेरूलिक एसिड असते जे लिव्हर आणि स्तनमधील टयूमरचा आकार कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.
3) जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं फ्री रॅडिकल्समुळे सुरकुत्या येऊ लागतात. कॉर्न बीटा कॅरोटनीनने परीपूर्ण असते. यातील व्हिटामीन सी, व्हिटामीन ए, आणि इतर एंटीऑक्सिडंट्स तुमची त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते आणि वय वाढीच्या लक्षणांना रोखण्यास मदत करतात.
4) मका मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयर्न, यांसारख्या खनिजांनी परीपूर्ण असतो. यामुळे मका हाडं निरोगी राहण्यास मदत होते. मक्यामुळे संधीवातासारख्या समस्या टाळता येतात. मक्यात बीटा कॅरोटनीन भरपूर प्रमाणात असते. यामुळे व्हिटामीन ए वाढण्यास मदत होते. व्हिटामिन तुमची दृष्टी सुधारण्यास आणि डोळ्यांसंबंधित समस्या रोखण्यास फायदेशीर ठरते.
5) मक्यामध्ये फोलेट देखील भरपूर असते, ज्याला व्हिटॅमिन बी9 असंदेखील म्हणतात. आपल्या शरीरासाठी हे पोषक तत्व अनेक प्रकारे कार्य करते. विशेषतः गर्भधारणेदरम्यान महिलांसाठी हे महत्वाचे आहे. खरं तर, फोलेट निरोगी लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये आणि गर्भाशयात बाळाच्या विकासात योगदान देते.