8.7 C
New York

Hemangi Kavi: छायडे! “तु कमाल थी, कमाल है और…”, हेमांगी कवीची ‘ती’ भावुक पोस्ट

Published:

Hemangi Kavi: अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) यांच्या दमदार अभिनयाची ओळख आता अख्या जगाला झाली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये छाया कदम यांनी आपला एक ठसा उमटवला आहे. कान फेस्टिव्हलमध्येही छाया कदम यांचं भरभरून कौतुक झालं. आता अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) छाया कदम यांच्याविषयी एक भावुक पोस्ट लिहिली आहे. ज्या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अभिनेत्री हेमांगी कवी ही एक संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तसंच काहीवेळा तिच्या पोस्टसुद्धा चर्चेत असतात. आता पुन्हा एखदा हेमांगीने एक खास पोस्ट छाया कदम यांच्यासाठी लिहिली आहे.

काय लिहिलंय हेमांगी कवीने पोस्टमध्ये?
Hemangi Kavi: Cannes ला जायच्या आधीच्या आणि आता येणाऱ्या प्रत्येक achievement साठी तुझं खूप खूप कौतुक छायडे आणि अगणित शुभेच्छा! तू तिथे जायच्या आधीही एकदम भारीच होतीस गं. मराठीतली तुझी सर्व कामं, हिंदीत ‘अंधाधुंद’, ‘झुंड’, ‘गंगूबाई काठीयावाडी’, आताचा ‘लापता लेडीज’, ‘मडगाव एक्स्प्रेस’ किती तरी सुंदर सुंदर कामं केलीस पण तुझं जे भारीपण आहे ते आपल्या मराठी मीडियाच्या लक्षात यायला खूप उशीर झाला असं मला वाटतं. त्यासाठी तुला परदेशी जाऊन यावं लागलं. अक्षरश: डोक्यावर घेतलं! ‘देर आए दुरूस्त आए’ म्हणायचं.

‘फिर आयी हसीन दिलरुबा’चा दमदार ट्रेलर एकदा पहाच!

खूप लोकांनी तुझं कौतुक केलं याचा आनंद-हेमांगी कवी
बऱ्याच लोकांनीही तुझं कौतुक केलं, ते तुझ्याबद्दल आणखी आणखी वाचत होते कारण लोकांना वाचायला, आणि तुला बघायला मज्जा येत होती. So यानिमित्ताने मला सर्व Media ला विनंती करावीशी वाटते की कुठल्या अभिनेत्रीने किती लग्नं केली, कुणाबरोबर फिरते, काय कपडे घातलेत, मूल का नाही असल्या फालतू आणि लोकांना बोअर करणाऱ्या बातम्यांपेक्षा तिच्या कामाबद्दल माहिती दिली, जमलं तर प्रसंशा केली तर बरं होईल आणि तुम्हांला social media वर उत्तम engagement ही मिळेल. जशी तुम्ही छायाच्या वेळी मिळवलीत. असो.

तू कमाल थी, है और रहेगी
Hemangi Kavi: एक असा काळ होता जेव्हा serial वाले तुला शूटिंग साठी स्वतः चे कपडे आणत जा असं सांगायचे आणि आज, जगभरातले मोठमोठे designers तुला त्यांचे कपडे देत आहेत. क्या बात है. तुझ्या अभिनयाच्या achievements सोबत या achievement चं कौतुक वाटतंय गं मला, कारण आपल्याला माहीतीए गं ‘स्वतःचे कपडे आणा’ सांगितल्यावर काय वाटायचं. बाकी तू कमाल थी, कमाल है और कमाल रहेगी! We Love You!

हेमांगी कवीने अशी पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केली आहे. सोशल मीडियावर या पोस्टची चांगलीच चर्चा होत आहे. तसंच हेमांगीने जे फोटो पोस्ट केले आहेत त्यावरही लाईक्सचा आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img