26.6 C
New York

Ginger Water: रोज रिकाम्या पोटी आल्याचे पाणी प्या, जाणून घ्या ‘५’ फायदे

Published:

Ginger Water: भारतीय स्वयंपाकघरात, आपण भाज्यांपासून ते चहापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये अद्रक वापरतो. चव वाढवण्यासाठी आपण अनेकदा भाज्यांमध्ये आल्याचा वापर हमखासपणे करतो. विशेषत: आल्याचा वापर हिवाळ्यात जास्त प्रमाणात केला जातो जेणेकरून ते शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की आले हे दिसायला विचित्र असले तरी त्यात भरपूर पोषक असतात. त्यात व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, कॉपर, मॅंगनीज क्रोमियम झिंक, असते. अदरकबद्धल अनेकदा एक समज आहे की ते पोटाला गरम करते, परंतु ते रिकाम्या पोटी पिणे योग्य आहे का? तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला आल्याची कोणतीही विशिष्ट ऍलर्जी नसेल तर तुम्ही रिकाम्या पोटी आल्याचे पाणी सहज पिऊ शकता. यातून तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळतील.

घराचे सौंदर्य वाढवतात ‘हि’ झाडे

सकाळी रिकाम्या पोटी आल्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे येथे आहेत.

  1. Ginger Water: जर तुम्हाला चरबी लवकर कमी करायची असेल तर चयापचय गती वाढवते . या परिस्थितीत अदरकचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने तुमची चयापचय गती वाढते. ज्यावेळी तुमची चयापचय क्रिया योग्यरित्या कार्य करत असते, त्यावेळी दिवसभरात सामान्य काम करत असतानाही कॅलरीज बर्न होतात. जे चरबी लवकरात लवकर बर्न करण्यास मदत करते. शरीराला हे नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यास देखील मदत करते.
  2. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे खास पाणी फायदेशीर आहे. आल्याचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. हे तुमच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. मधुमेहाशी ज्या समस्या असतात त्यादेखील दूर होण्यास मदत होते.
  3. आल्याचे पाणी (Ginger Water) त्वचेसाठी फायदेशीर आहे. आल्याचे पाणी शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. त्यामुळे शरीरातील घाणही निघून जाते. अदरकमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सशी लढण्यात यशस्वी ठरतात जे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे कारण असू शकतात. आले त्वचेवर पुरळ, आणि सुरकुत्या व बारीक रेषा यांसारख्या वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यास मदत करते. हे रक्ताशी संबंधित विकार दूर करण्याचे काम करते, ज्याचा थेट परिणाम त्वचेवर होतो.
  4. आल्याच्या पाण्याने शरीरातील सूज देखील कमी होते. कोणत्याही प्रकारची सूज जर तुमच्या शरीरात असेल तर दररोज आल्याचे पाणी प्या, शरीरातील सूज कमी होते. आले सूज आणि संबंधित रोग दूर करते. जळजळ आणि जंतू निर्माण करणार्‍या हानिकारक जीवाणूंशी लढण्यासाठी ते उपयुक्त बनवते. अदराकाचे पाणी जुनाट जळजळीशी लढण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
  5. Ginger Water: रिकाम्या पोटी आल्याचे पाणी पिणे पोटासाठी फायदेशीर आहे पचनक्रिया मजबूत करते. बद्धकोष्ठता, गोळा येणे, अदरक पाणी अपचन, उलट्या मळमळ आणि जुलाब यासारख्या समस्या दूर करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. याशिवाय हे शरीरामधील खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्यासही मदत करते. हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारख्या आजारांचा धोका कमी करण्यासोबतच हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img