8 C
New York

Mumbai Water Cut Withdrawn : मुंबईकरांना दिलासा, पाणी कपात सोमवारपासून मागे

Published:

मुंबई

मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai News) करणाऱ्या जलाशयांमध्ये मुसळधार पाऊस, पाणीसाठ्यात मोठी वाढ. सध्या विहार, तुळशी, तानसा आणि मोडकसागर हे चार जलाशय भरून वाहत आहेत. सोमवार, 29 जुलै 2024 पासून मुंबईच्या (Mumbai Water Cut Withdrawn) पाणीपुरवठ्यातील 10% पाणीकपात (BMC) मागे घेतली जाणार आहे.

धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू केली होती. मात्र जुलै महिन्यातील पावसामुळे पाणीसाठा वाढू लागला असून त्यामुळे कपात रद्द करण्याची मागणी होऊ लागली होती. गुरुवारी दिवसभरात विहार आणि मोडक सागर हे जलशय काठोकाठ भरले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी चार धरणे भरल्यामुळे पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा 66.77 टक्क्यांवर पोहोचले आहे. तुलसी, विहारनंतर तानसा देखील ओव्हरफ्लो झाला आहे. मोडकसागर तलाव देखील ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.  मोडकसागरमध्ये 98.66 टक्के जलसाठा आहे,  मध्य वैतरणा 63.32 टक्के, भातसा 64.09 टक्के, अप्पर वैतरणा 34.13 टक्के आहे. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img