21 C
New York

Pune Rain : पुण्यातील परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता

Published:

पुणे शहरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. तर येत्या काही तासांमध्ये पुणे शहर (Pune Rain) परिसरातील, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा (Pune Rain)देण्यात आला आहे. यामुळे या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आणखी पाणी साचण्याची शक्यता पुणे शहराच्या सखल भागात आहे. 40000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून सुरु असल्याने मुठा नदीला पूर (Pune Heavy Rain) आला आहे. त्यामुळे डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या सखल भागांमध्ये पुणे शहरातील पाणी शिरले आहे. पूलाची वाडी आणि एकता नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे.

पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर लोक एकता नगर परिसर, डेक्कन परिसर, निंबजनगर या परिसरात अडकले आहे. पुणे महापालिकेने (Pune Rain) जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग कमी करण्याची विनंती केली. उत्तर जलसंपदा विभागाने महापालिकेला मात्र मुसळधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग आणखी वाढवावा लागेल असं आदेश दिलं आहे. नदी परिसरातील परिस्थिती आणखी पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर भीषण होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पाणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाकडून कोणतीही मदत काही भागात मिळत नसल्याचं चित्र दिसून येत आहे. सिंहगड परिसरातील निंबजनगरमध्ये महिला, लहान मुले, नागरिक अडकले आहेत. एकतानगर परिसरात बोटीद्वारे बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

पुण्यातील पूर परिस्थितीवर सुप्रिया सुळे प्रशासनावर संतापल्या

Pune Rain पुण्यातील अनेक भाग गेले पाण्याखाली

पुण्यातील अनेक भागांत अक्षरश: छातीपर्यंत पाणी भरलं आहे. सिंहगड रस्त्यावरील सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) 5 सोसायट्यांमध्ये पाणी घुसलं आहे. पाणी नागरिकांच्या घरात घुसलं असून घरातील सर्व सामान पाण्याखाली गेलं आहे

Pune Rain पुण्यात धक्कादायक घटना! विजेचा शॉक लागून 3 तरुणांचा मृत्यू

पुण्यात तीन तरुणांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. पुलाची वाडी येथील डेक्कन नदीपात्रातील ही घटना आहे. तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या जागी हलवत असताना शॉक लागून झाला आहे. तिथे गुडघाभर पाणी साचलं होते. महावितरणाने घटनेची पुष्टी केली आहे. त्यांचे अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. पोलीस, महापालिका अधिकारीही घटनास्थळी आहेत.

Pune Rain पुण्यातील भिडे पूल गेला पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे पुण्यात (Pune Rain धरणातील विसर्ग सुरू केला आहे. काल रात्री भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे. गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्तीत पाणी शिरले आहे. संगम पूल पुलासमोरील वस्तीत पाणी गेले आहे. कॉर्पोरेशन जवळील पूल बंद होण्याची शक्यता आहे.

Pune Rain पुणे धरणसाठा

खडकवासला १०० टक्के
टेमघर ५७ टक्के
वरसगाव ६३ टक्के
पानशेत ७६ टक्के

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img