11.7 C
New York

Share Market : शेअर मार्केट आजही धडाम! सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण

Published:

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशाचं (Share Market) बजेट सादर केल्यानंतर शेअर मार्केटमध्ये हाहाकार उडाला (Union Budget 2024) आहे. मार्केटमध्ये घसरण सुरुच असून आजही हा ट्रेंड कायम दिसत आहे. आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स 606 अंकांनी घसरून 79 हजार 542 अंकांनी उघडला. निफ्टीमध्येही उदासिनता दिसली. आज सकाळच्या सुरुवातीच्या सत्रात निफ्टीमध्ये 180 अंकांची घसरण दिसून आली. या घसरणीसह निफ्टी सध्या 24 हजार 230 या पातळीवर व्यवहार करत आहे.

यंदाच्या बजेटमधून शेअर मार्केटमध्ये निराशा निर्माण झाली. बजेट सादर होताच शेअर बाजार कोसळला होता. हा ट्रेंड अजूनही कायम राहिलेला आहे. आजच्या दिवसाची सुरुवात घसरणीने झाली. बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांनी आज व्यापार सत्राची सुरुवात लाल रंगात दाखवली. बीएसई सेन्सेक्स 625 अंकांनी घसरून 79 हजार 522.95 वर उघडला. एनएसई निफ्टीत 0.75 टक्के घसरण नोंदवण्यात येऊन 24 हजार 230.95 वर उघडला. निफ्टीत एसबीआय लाइफ इन्शुरन्स, एल अँड टी, टाटा मोटर्स, नेस्ले आणि एचयुएल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या टप्प्यात वाढ नोंदवली. टाटा स्टील, श्रीराम फायनान्स, पॉवर ग्रीड कॉर्प, हिंदाल्को, अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. टाटा गोल्डच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली. यामुळे भागधारकांचे टेन्शन वाढले आहे. शेअर्सच्या किंमती वाढून बाजार पुन्हा कधी रुळावर येणार याची काळजी भागधारकांना लागली आहे.

दरम्यान, एनडीए सरकारचा तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिला अर्थसंकल्प मंगळवारी (23 जुलै) सादर झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडला. (Stock Market). अर्थसंकल्प सादर होण्याआधी बाजारात सुरुवात वाढीने झाली होती. मात्र, काही वेळातच घसरण व्हायला लागली. यामध्ये सेनसेक्स 1000 अंकांनी घसरला होता. तर निफ्टीमध्ये 382 अंकांची घसरण झाली होती. सोमवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स 80502 अंकावर होता. तर मंगळवारी सुरुवातीला उसळी घेत 80724 अंकापर्यंत पोहोचला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img