21 C
New York

Supriya Sule : पुण्यातील पूर परिस्थितीवर सुप्रिया सुळे प्रशासनावर संतापल्या

Published:

पुण्यात मुसळधार पावसामुळे (Pune Heavy Rain) अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. याचदरम्यान सरकारवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी निशाणा साधला. पुण्यातील परिस्थिती अतिशय चिंताजनक आणि भयानक आहे. मला आश्चर्य वाटलं, जेव्हा मंत्री पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे, असं बोलत आहे. सर्व यंत्राणा कामाला लागली आहे. त्याबद्दल मी मंत्रींचे आभार मानते. परंतु नियंत्रणात काहीही नाही. लोक पॅनिक झाले आहेत. लोकांकडे खाण्यासाठी-पिण्यासाठी काहीही नाहीय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही-

पुण्यात ज्या प्रकारची कामं झालीत, त्यामुळे पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही. खासदार मुरलीधर मोहळ म्हणाले की, नद्यांच्या पात्रांजवळ जास्त पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नाल्याचं प्लॅनिंगच नाही झालं रस्ते, मेट्रोची काम झालीत, मी नेहमी सांगत आलीय, हलगर्जीपणा विकास कामाच्याबाबतीत नको. इन्फ्रास्ट्रक्चरची काम गेले अनेक वर्षे प्रशासनाकडून झालेली आहे, आजची परिस्थिती त्यामुळे निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडला जातोय, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात कोसळली दरड

Supriya Sule आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा-

मुसळधार पावसाचा इशारा आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाचा इशारा त्यामुळं आज देण्यात आला आहे. तसेच मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img